Seasonal wild Fruits Goa Dainik Gomantak
गोवा

Summer Fruits: चढ्या दराने 'चुरने' बाजारात दाखल! करवंदे, जांभळं गैरहजर; ग्राहक प्रतिक्षेत

Seasonal Wild Fruits Goa: सध्या रानमेव्याचे दिवस असले तरी रानात चुरने (तोरणे/चुन्ना ) सोडल्यास अपेक्षेप्रमाणे अजून अन्य रानमेवा बहरलेला नाही.

Sameer Panditrao

पणजी: सध्या रानमेव्याचे दिवस असले तरी रानात चुरने (तोरणे/चुन्ना ) सोडल्यास अपेक्षेप्रमाणे अजून अन्य रानमेवा बहरलेला नाही. सध्या डिचोलीच्या बाजारात चुरने विक्रीस आली आहेत मात्र त्यांचे प्रमाण कमी असल्याने ती बाजारात भाव खाताना दिसत आहेत.

30 रुपये माप अशा वाढीव किंमतीत ही 'चुरने' विक्रेते विकत आहेत. चुरणे बाजारात आलेली असली तरी जांभळे, करवंदे आदी रानमेवा मात्र बाजारात अजून हजर झालेला नाही. रानमेवा प्रेमींना आता त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

ग्रामीण भागातील लोक रानमेवा बाजारातून विकत आणण्यापेक्षा जवळच्या रानावनात धुंडाळून खाण्यात अधिक मौज घेतात. चुरने, करवंदे, जांभूळ आदी सहज उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यासाठी गावागावातील मुले, युवक-युवती आदी नागरिक रानावनात भटंकती करताना दिसतात. मात्र अद्याप रानात देखील हा रानमेवा पिकलेला दिसत नाही. 

उष्णतेचा पारा चढला आणि उकाडा असह्य झाला, की प्रत्येकाला रानावनात पिकणारी रसाळ फळे अर्थातच रानमेव्याची आठवण होते. निसर्गाच्या करणीने उन्हाळ्यात साधारण मार्च महिन्याच्या शेवटी रानावनात रानमेवा बहरात असतो. आरोग्यवर्धक आणि गुणकारी असलेल्या आणि उन्हाळी मोसमात बहरणाऱ्या रानमेव्याची चव एकदातरी चाखण्याचा मोह प्रत्येकाला असतो.

मात्र गेल्या वर्षभरात अधूनमधून पडलेल्या अवकाळी पावसामुळे निसर्गाचा अनमोल ठेवा आणि गुणकारी असलेल्या रानमेव्याच्या बहरावर विपरीत परिणाम झाल्याचा अंदाज आहे. त्यातच बहूतेक माळराने आगीत खाक झाल्याने चुरने, करवंदांच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा रानमेव्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT