Bison Attack Goa Dainik Gomantak
गोवा

Ponda: रात्री रस्त्यांवर गवे, बिबट्याचा मुक्तसंचार; फोंडा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत

Ponda Wildlife: वन्य प्राण्यांनी सध्या फोंडा तालुक्यात उच्छाद मांडला असून केरी - फोंडा येथील एका शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्यामुळे हा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: वन्य प्राण्यांनी सध्या फोंडा तालुक्यात उच्छाद मांडला असून केरी - फोंडा येथील एका शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्यामुळे हा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार लोकांचा थरकाप उडवत असतानाच गव्यांचे कळप फोंडा तालुक्यात ठिकठिकाणी दिसत असून भर शहरात रात्रीच्यावेळी गवे गस्त घालत असल्याचे धक्कादायक चित्र पाहण्याचा प्रसंग फोंडावासीयांवर आला आहे.

फोंडा तालुक्यात वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला आहे. बिबट्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. विशेषतः प्रियोळ मतदारसंघात सर्वात जास्त वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या वन्य प्राण्यांमुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्यांसह गव्यांचा वन खात्याने त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी म्हार्दोळ येथे सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे, मात्र या रानटी प्राण्यांना हुसकावून लावायचे कसे, हा यक्ष प्रश्‍न वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

बिबट्या वाघांचा फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी वावर आहे. विशेष म्हणजे प्रियोळ मतदारसंघातील म्हार्दोळ, तसेच मडकई मतदारसंघातील मडकई औद्योगिक वसाहतीजवळील रानात बिबटे दिसले आहेत. बोरी, कवळे आदी भागात सातत्याने बिबट्यांचे दर्शन झाले आहे. मागच्या काळात म्हार्दोळ भागात दोन बिबटे रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या फासात अडकल्याने जखमी झाले होते व नंतर मरण पावले होते. विशेष म्हणजे ब्लॅक पँथर प्रियोळ मतदारसंघातीलच कोने येथील मुख्य रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत दोन महिन्यांपूर्वी सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT