Cuncolim News Dainik Gomantak
गोवा

Cuncolim: इकडे प्रदूषणाचा फटका, तिकडे रानटी जनावरांचे संकट; कुंकळ्ळीत बागेच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

Cuncolim Farming Damage: पावसाळ्यात रोगराईने उध्वस्त झालेल्या शेतीची योग्य प्रकारे नुकसान भरपाई मिळाली नाही, बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभही घेता आला नाही.

Sameer Panditrao

Wild Animal Damage Farming Cuncolim

मडकई: कुंकळ्ये प्रियोळ भागातील शेतकरी आधीच औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे उदभवणाऱ्या शेतीच्या नुकसानीच्या संकटाला तोंड देत असताना आता रानटी जनावरांचेही मोठे संकट त्यांच्यावर कोसळले आहे.

अलीकडेच सुरेश रामा नाईक यांच्या अननस बागेवर रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

सुरेश नाईक यांनी सांगितले की, चांगली मेहनतीने लावलेली अननस बाग फळधारणा होण्याच्या अवस्थेत होती. मात्र, रानडुकरे आणि गव्यांनी बागेत घुसून झाडे उद्ध्वस्त केली. काही झाडांची मुळे उकरून टाकली, तर काही फळे चावून खराब केली.

या प्रकारामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यंदा पावसाळ्यात रोगराईने उध्वस्त झालेल्या शेतीची योग्य प्रकारे नुकसान भरपाई मिळाली नाही, बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभही घेता आला नाही. आता तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उध्वस्त झालेल्या अननस बागायातीची नुकसान भरपाई द्यावी.

स्थानिक शेतकरी संघटनांनीही या प्रश्नावर तोडगा काढावा, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केरी प्रियोळ मधील प्रगतशील शेतकरी दिनेश पांडुरंग गावडे यांनी केली आहे.

गौरेश गावडे, प्रगतशील शेतकरी

संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, पंचायतीनेही या विषयावर गंभीरतेने लक्ष द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT