Sachin Pilgaonkar Goa Book Festival
Sachin Pilgaonkar Goa Book FestivalDainik Gomantak

Sachin Pilgaonkar: 'शोले' सिनेमासाठी पैसेच मिळाले नाहीत! सचिन पिळगावकरांचा गोव्यात खुलासा; अजूनही 'यंग' दिसत असल्याचे सांगितले गुपित

Sachin Pilgaonkar Sholay Movie Payment: अभिनेता सचिन यांनी आपण पुस्तके वाचनाने नाही, तर जी माणसे भेटली, त्यांच्यामुळे घडलो, असे स्पष्टीकरण श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नावर दिले.
Published on

पणजी: डिजिटल युगात मुलांच्या हातातून मोबाईल सुटत नसल्याचे दिसत आहे, ही एक समस्या असली तरी मूलतः पालकांनीच मोबाईलचा वापर कमी करून त्यांनी पुस्तके वाचनात गुंतवणूक घ्यावे, मुलांशी पुस्तकातील उताऱ्यांवर चर्चा करावी, तरच मुलेही पालकांचे अनुकरण करतील आणि त्यांना आपोआप पुस्तके वाचनाची आवड निर्माण होईल, असे सांगताना अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आपण पुस्तके वाचनाने घडलो नाही, तर आपणाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जी माणसे भेटली, त्यांच्यामुळे घडलो, असे स्पष्टीकरण श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नावर दिले.

पणजीतील कांपाल येथील बांदोडकर मैदानात भरलेल्या पुस्तक महोत्सवाच्या शेवटच्या दिवसातील सत्रात ते बोलत होते. अमित भाटिया यांनी त्यांच्याशी संवाद साधला. वयाच्या साडेचार वर्षी बाल अभिनयासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारापासून सुरू झालेल्या चर्चेचा नदिया के पारमधील ‘कौन दिसा मे लेके चला रे बटोहिया‘ या गीताने सांगता झाली. सुमारे दीड तासाच्यावर चाललेला या संवादाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

अजूनही आपण यंग (तरुण) दिसता, याचे श्रेय आईला देत सचिन यांनी यापेक्षा कमी दिसण्यामागील राज खुला केला. त्यात व्यायाम, खाण्यावरील नियंत्रणाचाही समावेश आहे, गोरा-गुमटा चेहरा दिसण्यामागे सचिन यांनी आजपर्यंत स्नान करताना चेहऱ्यावर केवळ साबण लावत असून, कोणतेही फेशियल करीत नसल्याचेही नमूद केले.

अजूनही आपण आईबरोबर रात्रीचे जेवण घेतो, ‘आई-वडिलांना खऱ्या अर्थाने तुमचा पैसा लागत नाही, त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. त्यांच्याबरोबर वेळ घालवला, गप्पा मारल्या तरी त्यांना तो मोठा आनंद असतो, आई-वडिलांचे कर्ज तुम्ही कधीच फेडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा,‘ असा सल्लाही ते देण्यास विसरले नाहीत.

Sachin Pilgaonkar Goa Book Festival
Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

पिळगावात घर बांधणार!

सचिन म्हणाले, पिळगावात घर बांधण्याचा आणि गोमंतकीय कलाकारांबरोबर चित्रपट करण्याचा विचार आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट एआयच्या निमित्ताने करण्याचा विचार आहे. लक्ष्मीकांत बेर्डेबद्ल बोलताना सचिन म्हणाले, तो प्रसिद्ध कलावंत होताच, पण दहापटीने तो चांगला माणूस होता. माझ्या ‘हाच माझा मार्ग' या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आली. प्रत्येक आवृत्तीत मी अतिरिक्त माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुस्तक नव्याने वाचनाऱ्याला व पुन्हा पुन्हा वाचणाऱ्यालाही नवी माहिती मिळते.

Sachin Pilgaonkar Goa Book Festival
Varsha Usgaonkar: "घरच्यांना वाटायचं मी राजकारणात जाईन, पण..." मडगाव पालिकेत वर्षा उसगावकरांची दिलखुलास फटकेबाजी

पैसे नाही, एअर कुलर दिला!

याशिवाय ‘शोले‘ चित्रपटासाठी आपण सहायक म्हणून कोणतेही काम केलेले नाही, ती अफवा आहे. आपण केली ती मदत होती, असे प्रांजळपणे सचिन यांनी कबूल केले. हा चित्रपट मिळण्यामागे रमेश सिप्पी यांच्या त्यापूर्वी ‘ब्रह्मचारी‘ चित्रपटात काम केले होते. मात्र, शोले हा आपल्या नशिबाने हा चित्रपट बनला. अहमदचा मृत्यू होणे हा चित्रपटातील तो टर्निंग पॉईंट ठरला असल्याचे सांगत त्यांनी रमेश सिप्पी यांचा हा चित्रपट सुपरडपर हिट झाला, त्यांनी आपणास पैसे दिले नाहीत. परंतु १९७५ मध्ये आपणास एअर कुलर भेट दिला होता, ही आठवणही यावेळी सचिन यांनी आवर्जून सांगितली. याशिवाय सचिन यांनी रामसे बंधूंच्या ‘और कौन'' या चित्रपटात काम करण्यामागील कारणही श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com