
Abandoned Vehicles In Valpoi
वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील अनेक महिन्यांपासून विनावापर पडून असलेली आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी दिले आहेत. महिन्याभरात सदर वाहने न हटवल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांबाबत स्थानिक नगरपालिकेने उपजिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. त्यावर जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी हा आदेश जारी केला आहे.
वाळपई पालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. शहराचा विस्तार आणि वाहनसंख्येत झालेली वाढ पाहता योग्य वाहतूक नियोजनाची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वाळपई शहरातील रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे.
यासंदर्भात वाळपई नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरेंद्र बाणावलीकर यांनी सांगितले की, ‘वाहने हटविण्याच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. तसेच भविष्यात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सर्व वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल.’
गेल्या सहा महिन्यांपासून वाळपईच्या विविध भागांत चार निष्क्रिय वाहने पार्क करून ठेवण्यात आली आहेत, जी वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक आराखडा तयार झालेला असून वाळपई न्यायालय ते पोलिस स्थानकापर्यंतच्या रस्तावर ‘नो पार्किंग झोन’ करा असे निर्देश आलेले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.