Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

Luizinho Faleiro: खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन काय म्हणाले? कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

फालेराे 26 नोव्हेंबर 1998 08 फेब्रुवारी 1999 या कालावधीत गोव्याचे मुख्यमंत्री होते.

Pramod Yadav

Luizinho Faleiro Resigns: तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेराे यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीश धनकर यांच्याकडे फालेरो यांनी राजीनामा सुपूर्द केला. फालेरो हे गोव्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

फालेराे 26 नोव्हेंबर 1998 08 फेब्रुवारी 1999 या कालावधीत गोव्याचे मुख्यमंत्री होते. दरम्यान, त्यांनी कांग्रेसनंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर फालेराे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फालेरो यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्या विरोधात फातोर्डा येथून लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व फालेरो यांच्यावर नाराज होते. TMC ने राज्यसभा खासदार अर्पिता घोष यांचा राजीनामा मागून 2021 मध्ये फालेरो यांना राज्यसभेवर पाठवले होते. अर्पिता घोष यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत होता.

गोव्यातील पक्षाच्या कामकाजापासून बराच काळ दूर राहिल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून फालेरो यांचा राजीनामा मागितला जात होता. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लुइझिन्हो फालेरो काय म्हणाले?

लुइझिन्हो फालेरो यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, "मी TMC सोडत आहे. सध्या अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. भविष्यात काही निर्णय घेतला तर मी तुम्हाला कळवीन." असे म्हणाले.

'ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून आणि प्रेरणेने ते टीएमसीमध्ये सामील झाले होते. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. माझ्यावर विश्वास ठेवून मला महत्त्वाचे पद दिल्याबद्दल बॅनर्जींचे आभार मानतो.' असे फालेरो यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

टीएमसीचे निवेदन

फालेराे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीएमसीने देखील एक निवेदन जारी केले आहे. 'फालेरो यांनी पक्ष सोडल्यानंतर आम्ही दक्षिण गोव्यात दुसरा उमेदवार उभा करू. आम्ही फालेराे यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. ते यापुढेही गोव्यातील जनतेची सेवा करत राहतील, अशी आशा आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT