Luizinho Faleiro: लुईझिन फालेरो यांचा खासदारकीचा राजीनामा

गेल्या काही काळापासून होती चर्चा
Luizinho Faleiro resigns as MP
Luizinho Faleiro resigns as MP Dainik Gomantak
Published on
Updated on

Luizinho Faleiro resigns as MP: तृणमूल काँग्रेसचे गोव्यातील नेते लुईझिन फालेराे यांनी त्यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीश धनकर यांच्याकडे फालेरो यांनी राजीनामा सुपूर्द केला. गेल्या काही काळापासून ते राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती.

गतवर्षी गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेस पक्ष ताकदीने रिंगणात उतरला होता. तेव्हा राज्यातील नेत्यांना बळ देण्यासाठी तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी विविध निर्णय घेतले होते. त्यातच राज्यात तृणमुलमध्ये प्रवेश केलेले लुईझिन फालेरो यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती.

तथापि, विधानसभा निवडणुकीत तृणमुलची कामगिरी चांगली झाली नाही. तृणमुलला एकही जागा मिळाली नाही. तुलनेच आम आदमी पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे तेव्हापासूनच लुईझिन यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज, मंगळवारी लुईझिन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pernem Road Issue
Bison Attack Death Betoda Goa
West Bengal Election Results 2026
Mapusa Police Arrest Murder Suspects
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com