Mid Day Meal Dainik Gomantak
गोवा

Mid Day Meal: विद्यार्थी समाधानी, आहार दर्जेदार, मग अक्षयपात्रला प्राधान्य कशासाठी? विजय सरदेसाईंचा CM सावंताना सवाल

Akshaya Patra controversy: स्थानिक महिला बचत गट दर्जेदार माध्यान्ह आहार पुरवूनही मुख्यमंत्री अक्षयपात्रचे समर्थन का करत आहेत हा सवाल विधानसभेत मुख्यमंत्र्यांना करण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी येथील रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर शाळेला भेट देऊन स्थानिक बचत गटाकडून दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराचा दर्जा तपासला.

स्थानिक महिला बचत गट दर्जेदार माध्यान्ह आहार पुरवूनही मुख्यमंत्री अक्षयपात्रचे समर्थन का करत आहेत हा सवाल विधानसभेत मुख्यमंत्र्यांना करण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक, दुर्गादास कामत आदी नेते होते.

या भेटीदरम्यान त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराच्या गुणवत्तेबद्दल विचारले. शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह आहाराबद्दल विद्यार्थी खूश आहेत का, असा सवालही त्यांनी केला. अनेक विद्यार्थ्यांनी सरदेसाई यांना शाळेत उत्तम दर्जाचे घरगुती जेवण मिळत असल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सरदेसाई यांनी वर्गातील विद्यार्थ्यांसह माध्यान्ह भोजनाचा आस्वादही घेतला. त्यानंतर सरदेसाई म्हणाले की, महिला बचत गट विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.

गोव्याचे लोक संपूर्ण भारतात चांगल्या दर्जाचे अन्न तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी ओळखले जातात. दर्जेदार माध्यान्ह आहार मिळाल्याने विद्यार्थीही खूश आहेत. असे असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अक्षयपात्र संस्थेला का पाठिंबा देत आहेत हे अजून आम्हाला कळत नाही.

‘बचत गटाची चांगली सेवा’

स्थानिक बचत गट कठोर परिश्रम करून चांगली सेवा देत आहेत, तर अक्षयपात्र संस्था इतरांकडून देणगी घेते. मुख्यमंत्र्यांनी अक्षयपात्रला पाठिंबा देण्यामागची कारणे मला जाणून घ्यायची आहेत. आगामी विधानसभेच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित करेन आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारणार आहे, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT