Indigo Flight 
गोवा

Indigo Flight: हनिमूनसाठी येत होता गोव्यात, फ्लाइटला 12 तास उशीर; इंडिगोच्या पायलटवर प्रवाशाने हात का उचलला?

पायलटवर हात उगारल्याप्रकरणी 28 वर्षीय कटारिया याला सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. मात्र, लगेच जामीनही मिळाला.

Pramod Yadav

Indigo Flight Incident: इंडिगो फ्लाइटमधील पायलटवर धावून जात चापट मारणारा प्रवासी साहिल कटारियाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विमान उड्डाणाला उशीर झाल्याने प्रवासी साहिलने वैमानिकावर हात उगारल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या दिवशी विमानतळावर दाट धुके होते आणि सकाळी 5 ते 10 या वेळेत विमानतळावरील दृश्यमानता शून्य होती. त्यामुळे 400 हून अधिक उड्डाणे उशीराने झाली.

साहिल प्रवास करत असलेल्या फ्लाईटलाही खूप उशीर झाला होता. त्यांचे विमान सकाळी 7.40 वाजता उड्डाण करणार होते, मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत ते उड्डाण झाले नाही. यानंतर संतापलेला साहिल को-पायलट अनूप कुमार यांच्यावर धावून त्यांना चापट मारली.

साहिलच्या फ्लाइटलाही 12 तासांपेक्षा जास्त उशीर झाला. साहिल आपल्या नवविवाहित पत्नीसोबत हनिमूनसाठी गोव्याला जात होता. या रागाच्या भरात त्याने पायलटवर हात उगारल्याची घटना घडली.

यावेळी वैमानिक फ्लाईटला उशीर झाल्याची घोषणा करत होता. पायलटवर हात उगारल्याप्रकरणी 28 वर्षीय कटारिया याला सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. मात्र, लगेच जामीनही मिळाला.

कटारिया यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले नाही, मात्र त्यांना कायमस्वरूपी नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात यावे, असे काहीजण मागणी करत आहेत.

रविवारी सकाळपासून दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांना उशीर होत होता. कटारिया इंडिगोच्या विमानात चढले. हे विमान सकाळी 7.40 वाजता उड्डाण करणार होते.

दुपारी 3 च्या सुमारास पायलट अनुप कुमार काही घोषणा करत असताना कटारिया यांनी त्यांच्यावर हात उचलला. मात्र, दुपारी 3.30 वाजता विमान आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाले.

इंडिगोने नंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेबद्दल लिहिले आणि कटारियाला उपद्रवी म्हणून संबोधले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. इंडिगोने सांगितले की, या घटनेची स्वतंत्र चौकशी केली जाईल आणि प्रवाशांना कायमस्वरूपी नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT