Why give another give five years to Babu Ajgaonkar  Dainik Gomantak
गोवा

नोकऱ्या देण्यासाठी बाबूंना आणखी पाच वर्षे कशाला?

पेडणे मतदारसंघात अनेक प्रकल्प आहेत. पण त्या प्रकल्पांत गोव्यातील युवकांना नोकऱ्या न देता परप्रांतीय राज्य गाजवत आहेत.

दैनिक गोमन्तक

मोरजी: बाबू आजगावकर यांना पेडणे मतदारसंघातील युवकांना नोकऱ्या देण्यासाठी आणखी पाच वर्षांची गरज का भासली? ते सध्या गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मग त्यांना जर आताच युवकांसाठी नोकऱ्या देणे शक्य नाही तर पुढच्या पाच वर्षांत ते कशा देतील? निवडणूक जवळ येताच बाबू लोकांच्या दारी जाऊन पाया पडून मते मागतात; पण निवडून आल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून मतदारांना विसरतात आणि स्वतःचा विकास करून घेतात, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्सचे सदस्य सुजय म्हापसेकर यांनी केला.

पेडणे मतदारसंघात अनेक प्रकल्प आहेत. पण त्या प्रकल्पांत गोव्यातील युवकांना नोकऱ्या न देता परप्रांतीय राज्य गाजवत आहेत. बाबूंच्या मागून फिरणारे कंत्राट घेतात आणि मतदारांच्या वाट्याला काहीही येत नाही. पेडणेतील रस्त्यांची दुरवस्था दिसून येते.

रोजगार देण्यासाठी ‘आरजी’ सक्षम

‘आरजी’ची दारोदारी मोहीम पेडणे मतदारसंघात जोरात सुरू आहे. येणाऱ्या विधानसभेला पेडणे मतदारसंघात आरजीचा उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही. आरजी स्थानिक युवकांना नोकऱ्या देण्यासाठी सक्षम आहे. पेडणेकरांना आता पेडण्याबाहेरील उमेदवारांची गरज नाही पेडणेतील उमेदवार जनतेला देण्यासाठी आरजी सक्षम आहे, असे सुजय म्हापसेकर म्हणाले.

पेडणेकरांना नोकऱ्या मिळत नसतील तर मोपासारख्या प्रकल्पाची पेडणेला गरज नाही. बाबूंनी एकेवेळी विमानतळाचे काम बंद पाडले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा काम सुरू केले. त्यानंतर आजपर्यंत बाबूंनी किती जणांना मोपा विमानतळावर रोजगार मिळवून दिला? त्यांनी फक्त नातेवाईकांना कंत्राटे दिली आणि स्वत: कमिशन मिळवले

- सुजय म्हापसेकर, आरजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT