Goa | Deviya Rane
Goa | Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Deviya Rane: पदयात्रेची सुरवात सत्तरीतूनच का? पदयात्रेत सर्व लोक बाहेरचे; आमदार दिव्या राणेंचे प्रतिपादन

दैनिक गोमंतक

Deviya Rane: रिव्होल्युशनरी गोवन्सच्या म्हादई बचावसाठीच्या पदयात्रेबाबत पत्रकारांनी आमदार दिव्या राणे यांना विचारले असता त्यांनी पदयात्रेची सुरवात सत्तरीतून का केली?, असा सवाल करत या पदयात्रेत सर्व लोक बाहेरचे आहेत, कुणीही सत्तरीतील नाही, असे स्पष्ट केले.

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, आम्ही पदयात्रा अडवलेली नाही. तर पंचायतींनी त्या पदयात्रेस विरोध केला आहे. पण माझा एकच सवाल आहे त्यांनी सत्तरीतच का पदयात्रा सुरू केली. त्यांचे स्वतःचे गाव आहे त्यांनी तिथून करायची होती सुरवात.

ही राजकीय हेतूने सुरू केलेली पदयात्रा आहे. पदयात्रेत सर्व लोक बाहेरचे. सत्तरीचे लोक त्यात काही नाही. स्थानिक पंचायत बॉडींनी आम्हाला हा त्रास नको असे म्हटले आहे. स्थानिकांनीच या पदयात्रेला विरोध केला आहे.

म्हादईवर परिणाम झाला तर त्याचा तोटा संपुर्ण राज्याला होणार आहे. केवळ सत्तरीला नाही. मग या पदयात्रेची सुरवात सत्तरीतूच का? आमच्या सर्व सरपंचांनी या पदयात्रेला विरोध केला आहे. त्यांनी ग्रामसभा घेऊन निर्णय घेतला आहे.

त्यांच्यावर अन्याय होणार नाही. त्यांच्या आमदारांवर, नेत्यांवर त्यांचा विश्वास आहे. सत्तरीचे लोक म्हणतात, आमचे आमदार, नेते सक्षम आहेत. सरकार सक्षम आहे.

पर्येत आयआयटीला विरोध

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, पर्ये मतदारसंघात आम्हाला आणखी एक आयआयटी नको. आणि मी त्याला अजिबात मंजुरी देणार नाही. आम्हाला नको आहे. काहीजण भडकविण्याचे काम करत आहेत. आमचे लोक शांत आहेत. आम्ही सर्व शांत लोक आहेत.

आरजी’च्या पदयात्रेला परवानगी नकोच!

दरम्यान, सत्तरी तालुक्यातील जनतेला म्हादई नदीचे गांभीर्य आहे. त्यामुळे कोणीही सत्तरी तालुक्यात येऊन म्हादईविषयी आम्हाला सांगण्याची गरज नाही. ‘आरजी’ने सुरू केलेल्या पदयात्रेची गरज नाही.

त्यामुळे कायदा- सुव्यवस्था बिघडू शकते. म्हणून ‘आरजी’ला पदयात्रेसाठी परवानगी देऊ नये, असे निवेदन आज सत्तरी तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी वाळपई उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांना सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT