CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या भेटीला...

नियोजित भेटीने उंचावल्या अनेकांच्या भुवया
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका नेत्याला भेटणार आहेत. बुधवारी (ता. 22 फेब्रुवारी) ही भेट होणार आहे. या नियोजित भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरकरणी ही भेट अराजयकीय असल्याची चर्चा असली तरी भेटीनंतर यातून अनेक राजकीय संदर्भ समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

CM Pramod Sawant
Japanese Student in Goa: 'त्या' जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांकडून आणखी एका जपानी विद्यार्थ्याची फसवणूक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील मोहोळ (जि. सोलापूर) चे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांची भेट घेणार आहेत. पाटील यांच्या अनगर येथील वाड्यावर सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभुमीवर माजी आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे तब्बल एक तास सकाळी साडेदहा ते साडे अकरा या वेळेत माजी आमदार पाटील यांच्याकडे थांबणार आहेत. त्यामुळे या एक तासातील संभाव्य चर्चेवरून आता चर्चा सुरू झाली आहे. सोलापुरमध्ये या भेटीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे माढ्याला जाणार असून, जाता जाता ते आमच्याकडे चहापानासाठी येत आहेत. एवढा मोठा नेता व एका राज्याचा मुख्यमंत्री अनगरमध्ये येत असल्याने राजकारणविरहित पाहुणा या नात्याने त्यांचे आदराथित्य करणे आपले कर्तव्य असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Panaji Crime Case: विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 'त्या' बसचालकाविरोधात 110 पानी आरोपपत्र...

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोहोळशी जुने संबंध आहेत. ते स्वतः डॉक्टर आहेत. आमचे अनेक नातेवाईक डॉक्टर असल्याने त्यांचा व मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा परिचय असल्याने ते येणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान डॉ. सावंत यांचे एक नातेवाईक मोहोळ येथे दहा ते बारा वर्षे राहत होते.

उद्योजक (स्व.) बजरंग गुंड यांचे ते चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांचे मोहोळशी वेगळे नाते असल्याचे उद्योजक वैभव गुंड यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा मित्र परिवार मोहोळ, मोडनिंब येथे आहे. तेही डॉ. सावंत यांना भेटण्यासाठी येऊ शकतात.

माजी आमदार पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच ‘अनगर आणि दहा गावे पाणीपुरवठा योजना’ व जुना असलेला ‘सीना-भोगावती जोड कालवा’ ही दोन कामे कोण करेल, त्याच्या सोबत मी जाणार असल्याचे म्हटले होते.

यापूर्वी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार पाटील यांनी साखर कारखान्याच्या कामाचे निमित्त करून दिल्लीवारी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com