Siolim Constituency Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत रंगणार ‘महाभारत’

13 उमेदवार रिंगणात : काँग्रेस-भाजप-अपक्षामध्ये खरी लढत

दैनिक गोमन्तक

Siolim: शिवोली मतदारसंघात सगळ्यात जास्त म्हणजे तेरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यात परत पाच अपक्ष आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे माजी आमदार विनोद पालयेकर हेही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. खरे तर पालयेकरांना गोवा फॉरवर्डची (Goa Forward Party) उमेदवारी मिळणार होती, पण काँग्रेस व गोवा फॉरवर्डची युती होऊन हा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) गेल्यामुळे पालयेकरांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागले. त्यांना आता भाजपच्या दयानंद मांद्रेकर यांच्याबरोबर काँग्रेसच्या मायकल लोबो यांच्या पत्नी दिलायला यांच्याबरोबर सामना करावा लागणार आहे.

मांद्रेकर हे शिवोलीतून चारवेळा निवडून आलेले आमदार. खरे तर शिवोली हा पूर्वी मगोपचा बालेकिल्ला, पण 1999 साली मांद्रेकरांनी हा मतदारसंघ काबीज केला. त्यानंतर 2012 पर्यंत सलगपणे ते चारवेळा निवडून आले. मात्र, गेल्या वेळेला त्यांचा गोवा फॉरवर्डच्या विनोद पालयेकरांकडून पावणे दोनहजार मतांनी पराभव झाला. आता परत त्यांचा संघर्ष पालेयकरांबरोबर आहे, पण आता डिलायलाच्या रुपाने या संघर्षाला तिसरा कोनही प्राप्त झाला आहे. दिलायला या बाहेरच्या उमेदवार असा सध्या प्रचार चालू असून त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी दिसत आहे. कॉंग्रेसने आतापर्यंत शिवोलीवर झेंडा न फडकवल्यामुळे त्यांच्या नाराजीला विशेष अर्थ प्राप्त होईल असे दिसत नाही.

मायलक लोबोंनी पत्नी जिलायला यांना भाजपची उमेदवारी मिळत नाही असे बघून काँग्रेसमध्ये उडी घेतली. त्यामुळे हे सगळे ‘महाभारत’ दिलायलांच्या उमदेवारीमुळे झाले असल्यामुळे शिवोलीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मायकल लोबोंनी बऱ्याच दिवसांपासून शिवोलीवर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी तिथे जोमाने कार्य सुरू केले आहे. अनेक पंच सरपंच सध्या दिलायला बरोबर फिरताना दिसत आहेत. पालयेकर हेही सध्या जोरात असून त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कार्याचा दाखला देत ते प्रचार करताहेत.

मांद्रेकर हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे ते भाजपच्या पुण्याईवर मतदारांकडे जाताना दिसताहेत, पण भाजपबद्दल सध्या अनुकुल हवा नसल्यामुळे त्यांना स्वतःचे ‘कार्ड’ वापरावे लागत आहे. मांद्रेकर हे अखिल गोमंतक भंडारी समाजाचे संबंधित असले तरी त्याचा त्यांना फायदा होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे पालयेकर हेही त्याच समाजातले आहेत. यामुळे शिवोलीत असलेली भंडारी समाजाची मते कोणाकडे वळतात ते बघावे लागेल.

मायकल यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय

दत्ताराम पेडणेकर, पल्लवी दाभोळकर, पॅट्रीक आल्मेदा हे अपक्ष म्हणून रिंगणात असून ते कोणाची किती मते घेतात ते बघावे लागेल. सध्या शिवोली जिंकणे हा माजी मंत्री मायकल लोबोंच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय बनला असून त्यामुळे ते ‘घारी’सारखे या मतदारसंघात फिरताना दिसताहेत. यावेळी शिवोली जिंकायचीच असा ते निर्धार व्यक्त करताना दिसताहेत, पण या निर्धारात शिवोलीचा आतापर्यंतचा इतिहास आड येत असून आता ते हा इतिहास बदलू शकतात की नाही हे बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT