फोंड्यात ‘इसकी टोपी उसके सर’

दिवसागणिक समीकरणात बदल; कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या उड्या सुरूच
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत: फोंड्यात सध्या ‘इसकी टोपी उसके सर’चे वातावरण दिसायला लागले आहे. दिवसागणिक समीकरणात बदल होताना दिसायला लागले आहेत. कार्यकर्ते आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात असे फिरताना दिसताहेत. त्यामुळे कोण कोणाचा हे समजेनासे झाले आहे. याच्यामागे अर्थकारण हा एक भाग असला, तरी बदलणाऱ्या निष्ठा हाही एक भाग आहे. त्यात परत एका पक्षाबरोबर वा उमेदवाराबरोबर फिरणारे कार्यकर्ते खाजगीत दुसरीच ‘बात’ करताना दिसताहेत. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेणे बरेच कठीण होत चालले आहे.

Goa Assembly Election 2022
कॉंग्रेसला पक्षांतरची शपथ द्यावी लागते; यासारखे दुर्दैव नाही: स्मृती इराणी

फोंड्यात (Ponda) सध्या सात उमेदवार रिंगणात असून त्यापैकी रवी नाईक हे सगळ्यात जास्त अनुभवी उमेदवार आहेत. रवी हे पाचवेळा फोंड्यातून, तर एकदा मडकईतून निवडून आले असून त्यांनी मुख्यमंत्रिपद, खासदारकी, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी सर्व महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे (Congress) उमेदवार राजेश वेरेकर हे अजूनपर्यंत एकदाही निवडणूक जिंकलेले नाहीत. 2017 साली त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून 4500 च्या वर मते प्राप्त केली होती. मगोपचे डॉ. केतन भाटीकर हेही फोंड्यातून प्रथमच निवडणूक (Goa Election) लढवित आहेत. चौथे उमेदवार अपक्ष संदीप खांडेपारकर यांनी 2007 साली भाजपतर्फे रिंगणात उतरून 6000 च्या आसपास मते प्राप्त केली होती. त्यांना विधानसभेचा अनुभव नसला तरी कुर्टी खांडेपार पंचायतीतील सरपंच असल्यामुळे पंचायतीचा अनुभव आहे. आपचे ॲड. सुरेल तिळवे यांनी गेल्या खेपेला मडकई मतदारसंघातून निवडणूक लढवून 900 मते प्राप्त केली होती. त्यामुळेच सध्या तरी एका बाजूला ‘अनुभवी’, तर दुसऱ्या बाजूला ‘नवशिके’ असे चित्र फोंड्यात दिसते.

रवी नाईक यांचे कार्यकर्ते त्यांनी केलेल्या फोंड्याच्या विकासाचे दाखले देऊन मते मागताना दिसत आहेत. फोंड्यातील बहुतेक विकास हा रवींच्या कारकीर्दीत झाला हे नाकारण्यात अर्थ नाही. काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर 2007 ते 2012 म्हणजे रवी नाईक गृहमंत्री असताना झालेल्या फोंड्याच्या विकासाचा दाखला देताना दिसताहेत. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात फोंड्याचा विकास झालेला नाही हेही ते नमूद करताना आढळतात. मगोतर्फे डॉ. केतन भाटीकर हे विकासाबद्दल बोलताना हीच गोष्ट अधोरेखित करतात. खास करून फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळात ‘सीटी स्कॅन’सारख्या आधुनिक सुविधा नसल्यामुळे रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जावे लागते हे ते आवर्जुन सांगत आहेत.

मगोपचे डॉ. केतन भाटीकर व अपक्ष संदीप खांडेपारकर हे प्रचारात सक्रिय झाले असून विजयाचा दावा करताना दिसताहेत. अशा अनेक ‘जर-तर’च्या समीकरणात फोंडा मतदारसंघाचे राजकारण सापडले असून याचा नेमका अन्वयार्थ काय निघतो ते बघावे लागेल. आपचे ॲड. सुरेल तिळवे व रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे सानिश तिळवे हेही प्रचार करताना दिसताहेत. नरेश पडवळकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. एकंदरीत सध्या फोंड्याची अवस्था ‘अजीब दास्तां है ये कहॉं सुरू कहॉं खतम’ अशी झाली असून या ‘दास्तां’ची ‘मंजील’ कोणती आहे याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार हे निश्चित.

Goa Assembly Election 2022
लता दीदींच्या निधनाने अतीव दुःख झाले: सदानंद शेट तानावडे

फोंड्याला हवा तिसरा जिल्हा

रवी नाईक हे आपण फोंड्याचा कायापालट केला सांगत असताना अजून फोंड्याला तिसऱ्या जिल्ह्याचा दर्जा मिळू शकलेला नाही याची खंत व्यक्त करतात. वास्तविक रवी गृहमंत्री असताना म्हणजे 2011 साली फोंड्याला तिसऱ्या जिल्ह्याचा दर्जा मिळणार होता. तशी ‘फाईल’ही तयार झाली होती, पण निवडणुकीच्या तीन महिन्याआधीच आचारसंहिता लागल्यामुळे ही ‘फाईल’ लटकली आणि त्यानंतर 2012 साली भाजप सरकार आल्यामुळे ती फाईल पुढे सरकू शकली नाही. मध्यंतरी डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्याला तिसरा जिल्ह्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते, पण ते आश्वासन अजून अंमलात आलेले नाही.

कार्यकर्त्यांत नाराजी

फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी काँग्रेसच्या राजेश वेरेकरांना पाठिंबा जाहीर केला. व्यंकटेश नाईक हे तीनवेळा निवडून आलेले नगरसेवक. सुरवातीला ते भाजपमध्ये होते, पण नंतर त्यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना फोंड्याची उमेदवारी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. व्यंकटेश नाईक व त्याचे कार्यकर्ते बरेच नाराज झालेले दिसत होते. आता फारवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी मध्यस्थी केल्यामुळे नाईक यांनी वेरेकरांना पाठिंबा जाहीर केला आहे. असे असूनसुध्दा त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी संपलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com