CVoter Survey Goa Dainik Gomantak
गोवा

CVoter Survey Goa: भाजप का काँग्रेस, गोव्यात लोकसभेला कोण जिंकणार? सी-व्होटर सर्व्हे काय सांगतो?

Pramod Yadav

ABP CVoter Survey Goa

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, शनिवारी (दि.16) दुपारी तीन वाजता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून देशात आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, राजकीय पक्ष निवडणुकीची जोरदार तयारीला लागले असून, विविध वृत्त वाहिनी आणि खासगी संस्थांचे सर्व्हे समोर यायला लागले आहेत.

गोव्यात दोनच लोकसभेच्या जागा असून, येथे भाजपने केवळ उत्तर गोव्यातील उमेदवार जाहीर केला आहे. तर, काँग्रेसने एकही उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही जागांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एबीपीचा सी- व्होटर सर्व्हे समोर आला असून, यात गोव्यात संभाव्य निकाल काय असू शकतो याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार गोव्यात भाजप एक तर काँग्रेस एक जागा जिंकण्याची शक्यता आहे. म्हणजे गोव्यात सध्या असणारी परिस्थिती येत्या लोकसभेत देखील कायम राहण्याची शक्यता असल्याचे सर्व्हे सांगतो.

एबीपीचा सी- व्होटर सर्व्हेनुसार, लोकसभा 2024 मध्ये गोव्यात एनडीए आघाडीला 45.6 टक्के मते मिळतील तर, काँग्रेस नेतृत्वातील युपीए आघाडीला 48.3 टक्के मते मिळतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक (57.12 टक्के मते) निवडून आले होते तर, दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन (47.47 टक्के मते) विजयी झाले होते.

गोव्यातील दोन्ही जागा भाजप प्रचंड मातांनी विजयी होईल असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. तर, काँग्रेसने देखील दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दरम्यान, दोन्ही जागांवर सध्या काँटे की टक्कर होणार असे दिसत आहे.

यापूर्वी INDIA TV-CNX केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यात कोण बाजी मारणार याबाबत अंदाज वर्तविण्यात आला होता. इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्वेक्षणात राज्यातील दोन्ही जागा भाजप जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

राज्यात आगामी लोकसभेत आरजीचे देखील उमेदवार असणार आहेत, आरजीचे खासदार निवडून आल्यास इंडिया आघाडीला पाठिंबा देतील असे जाहीर केल्याने पक्ष भाजपची मते फोडण्याचे काम करेल असे राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT