Goa: गोधनाच्या हत्येला जबाबदार कोण? Dainik Gomantak
गोवा

Goa: गोधनाच्या हत्येला जबाबदार कोण?

शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि गोधनावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळेच भटक्या व बेवारस गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण : रस्त्यावरील गोधनाच्या (Slaughter of cows) हत्येला जबाबदार कोण? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनुत्तरीत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात मडगाव -कारवार (Margao) हमस्त्याच्या गुळे ते माशे पर्यंतच्‍या टापूत वाहनांच्या धडकेने सुमारे पंधरा गुरांचा बळी गेला. तसेच भटक्या गुरांमुळे चाररस्ता ते माशे पर्यंतच्या बगलमार्गावर चार अपघात घडले. सुदैवाने कोणत्याच अपघातात मनुष्यहानी झाली नाही. (Who is responsible for Slaughter of cows in Goa)

शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि गोधनावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळेच भटक्या व बेवारस गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे पोळे ते गुळे व अंतर्गत भागात दोन हजारांपेक्षा जास्त भटकी गुरे आहेत. त्याच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुळे येथे मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या पंधरा गुरांना धक्का दिला. त्यापैकी अकरा गुरे जागीच ठार झाली. एका जखमी वासरावर उपचार करण्यात आले. या घटनेमुळे भटक्या गुरांच्या समस्येला कारणीभूत कोण? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

"पोळे ते गुळे पर्यंत मडगाव-कारवार महामार्गावर बेवारस गुरांचा उपद्रव पावसाळ्यात जास्त होतो. ठिकठिकाणी भटक्या गुरांचे ताफे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे रहदारीला त्रास होतो, रस्ते शेणाने भरल्याने निसरडे बनतात. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील फुलामळ येथे कामधेनू गोरक्षा संस्थेतर्फे पांचशे गुराची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्‍या या संस्थेकडे बावीस बेवारस गुरे आहेत. त्यांचे संगोपन गेले वर्षभर संस्था करीत आहे."

- अमेय पुराणीक, कामधेनू गोरक्षा संस्थेचे पदाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT