Goa: ‘बोंडला’त येणार मध्य प्रदेशमधील वाघांची जोडी

संध्या आणि राणाच्या डरकाळ्या बंद झाल्यापासून राज्यातील बोंडला अभयारण्य (Bondla Sanctuary) सुनेसुने झाले आहे.
Goa: Bengal Tiger
Goa: Bengal TigerDainik Gomantak

फोंडा : संध्या आणि राणाच्या डरकाळ्या बंद झाल्यापासून राज्यातील बोंडला अभयारण्य (Bondla sanctuary) सुनेसुने झाले आहे. राणा गेल्यानंतर अवघ्या एका वर्षात संध्याने अखेरचा श्‍वास घेतल्याने गेली चार वर्षे वाघांविना राज्यातील या पहिल्यावहिल्या प्राणी संग्रहालयाची शानच हरपल्यासारखे झाले आहे. मात्र, आता मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) वाघांची जोडी (Tigres) बोंडलाचीही शान जपणार आहे. मध्य प्रदेशमधील वन विभागाशी यासंबंधी बोलणी झाली असून, गव्यांच्या किंवा हरणांच्या बदल्‍यात ही वाघांची जोडी गोव्यात येणार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या संकल्पनेतून उसगाव - गांजे भागात बोंडला अभयारण्याची उभारणी झाली. पाच दशके पूर्ण झालेल्या आणि सुरुवातीला व्यवस्थित कार्यरत असलेल्या या अभयारण्याला ग्रहणच लागले आहे. सद्यस्थितीत बोंडला अभयारण्याचे दुरुस्तीकाम जोरात सुरू आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या या नूतनीकरण कामात प्राण्यांसाठी असलेले पिंजरे अधिक मोठे आणि सुविहित करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, त्याला मूर्त रूप देण्यात येत आहे. बोंडलात वाघांची जोडी आणण्यात येणार असल्याने त्यासाठीही नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

Goa: Bengal Tiger
Goa Tourism: गोव्याला फेणी पर्यटनाचा पर्याय

बोंडलाचे नवे रूप पर्यटकांना तर भावेलच पण पर्यटनक्षेत्र वृद्धीसाठी नवनवीन संकल्पना राबवण्याचा गोवा सरकारचा विचार आहे. सध्याच्या नूतनीकरणानंतर प्राण्यांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकार कार्यरत आहे, ही गोव्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली आहे.

कोरोनामुळे सध्या ‘बोंडला’ बंदच

कोरोना महामारीमुळे बोंडला अभयारण्य सध्या बंदच आहे. आता कोरोना महामारी बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर बोंडला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. बोंडलातील कॉटेजिसमध्ये पर्यटकांची राहण्याची सोय आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि प्राण्यांच्या उपस्थितीत येथील वास्तव्य आल्हाददायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया पर्यटकांकडून वेळोवेळी व्यक्तही झाल्या आहेत, मात्र अजून साधन सुविधा आणि नवीन प्राण्यांची उपलब्धी करण्याची गरजही व्यक्त होत आहे.

संध्या - राणाची जोडी जमलीच नाही

बोंडला अभयारण्यात यापूर्वी सिंहाचे वास्तव्य होते. नर आणि मादी बरोबर दोन पिल्ले असे हे वास्तव्य होते. मात्र नंतरच्या काळात सिंहांचे निधन झाल्यानंतर हा भव्य पिंजरा खालीच राहिला. त्यानंतर विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयातून राणा आणि संध्या या वाघांच्या जोडगोळीला बोंडलात आणले गेले. त्यासाठी बोंडलातून गव्यांची अदलाबदल करण्यात आली. वाटले होते, संध्या - राणाची जोडी मस्त जमेल आणि हा परिवार वाढेल. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे संध्या आणि राणाची जोडी कधी जमलीच नाही. या जोडगोळीत भांडणेच अधिक व्हायला लागली. त्यातच राणाला अगोदरच ‘ऑपरेट' केल्यामुळे परिवाराची वाढच खुंटली गेली, त्यामुळे मूळ उद्देशालाच सुरुंग लागला.

Goa: Bengal Tiger
थिवी रेल्वे स्थानकावर चार केरळी युवकांना आम्ली पदार्थांसह अटक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com