Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: ज्याच्याकडे आकडा त्याचीच सत्ता, हीच खरी लोकशाही!

वटहुकूम केवळ निवडणुकीतील गोंधळ टाळण्यासाठी असल्याचे दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat: ज्याच्याकडे जास्त आकडा (निवडून आलेले लोक) त्याच्याकडेच सत्ता हीच खरी लोकशाही आहे. ज्यांच्याकडे आकडा नाही त्यांनी गप्प बसणेच योग्य, अशा शब्दात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांना प्रत्युत्तर दिले. मडगाव पालिकेची सत्ता आपल्याहाती राहावी यासाठी दिगंबर कामत यांनी वटहुकूम आणून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला होता.

कामत म्हणाले की, वटहुकूम आणणारा मी कोण ? मी तर एक साधा आमदार. आमदार वटहुकूम आणू शकतो का ? मात्र वटहुकूम आला आहे तो चांगल्यासाठीच आहे. कायद्यात ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठीच आहे. सरकारने योग्य विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला आहे.

मडगाव पालिकेचे उदाहरण देताना कामत म्हणाले, आमच्याकडे 15 नगरसेवक होते पण त्यातील 10 नगरसेवकांनीच आमच्या उमेदवाराला मत दिले. आता पाचजण का आणि कसे फुटले त्यावर मला बोलायचे नाही, पण हे योग्य आहे का ?

विधानसभेत सभापतींची जेव्हा निवड होते, त्यावेळी हात दाखवून निवड होत नाही का ? विधानसभेला जो कायदा लागू होतो. तोच नगरपालिकेला लागू केल्यास त्यात चूक ती काय? असा सवाल त्यांनी केला.

कामत पुढे म्हणाले, नगरपालिका कायद्यात मतदान गुप्त रितीने केले पाहिजे हे कुठेही नमूद केलेले नाही. हे मतदान फक्त मतपत्रिकेद्वारा व्हावे एवढेच म्हटले आहे. तिथेही गुप्त मतदान कुठेही म्हटलेले नाही. मात्र काही निवडणूक अधिकारी या कायद्याचा स्वतःला पाहिजे तसा अर्थ काढून मतदान घेतात.

या प्रक्रियेत सरळता यावी आणि स्वतःला पाहिजे तसा निर्णय घेतला जाऊ नये यासाठीच हा वटहुकूम आणून कायद्यातील क्लिष्टता कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यात लोकशाहीविरोधी काहीही नाही, असे कामत यांनी 'गोमंतक'शी बोलताना सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa Today's News Live: साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

SCROLL FOR NEXT