Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Goa Election: मातब्बरांसह इच्छुक ‘वेटिंग’वर

Goa Election: कार्यकर्तेही सैरभैर; अनेकांवर देव पाण्यात ठेवण्याची वेळ

दैनिक गोमन्तक

Goa Election: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि ‘इंडिया’ आघाडीकडून उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आचारसंहिता लागण्याची घोषणा जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी या इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सैरभैरता दिसू लागली आहे. त्यामुळे इच्छुक असलेले विद्यमान खासदार श्रीपाद नाईक,

फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह ॲड. नरेंद्र सावईकर, दिगंबर कामत, ॲड. रमाकांत खलप आणि बाबू कवळेकर असे मातब्बर उमेदवारांवर आता देव पाण्यात ठेवण्याची वेळ आलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे मागील वर्षांपासून वाहू लागले, भाजपचे नेते आमचा उमेदवार ठरला म्हणून जाहीरपणे सांगत होते.

त्यात श्रीपाद भाऊ यांनीही स्वतःची निवडणूक लढवण्याची इच्छा काही दडवून ठेवलेली नाही. त्यामुळेच मध्यंतरी उत्तरेतील उमेदवारीसाठी दिलीप परुळेकर आणि दयानंद सोपटे यांनी ‘खडा’ टाकून पाहिला होता.

अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना तो ‘खडा’ विरघळण्यापूर्वी बाजूला करावा लागला.

दक्षिणेतून भाजपचे नरेंद्र सावईकर हे उमेदवार मानले जात असले तरी बाबू कवळेकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, तर दिल्लीला जाण्यास इच्छुक नसणाऱ्या दिगंबर कामत यांनाही पक्षाने ‘गॅस’वर ठेवले आहे.

खलपांची अस्वस्थता वाढली

काँग्रेसचे ॲड. रमाकांत खलप हे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, परंतु त्यात विजय भिके आणि राजन घाटे यांनीही दावा करायला सुरवात केली आहे, त्यामुळे खलपांची अस्वस्थता वाढली आहे. त्यात गिरीश चोडणकर उत्तरेत येऊ शकतात अशीही शक्यता आहे.

दक्षिणेत अल्पसंख्याक उमेदवारासाठी प्रयत्न

जशी श्रीपाद भाऊंची उत्तेरत स्थिती आहे, तशीच काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचीही दक्षिण गोव्यात स्थिती आहे. त्याठिकाणी नवा उमेदवार अल्पसंख्याकच देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांच्या गटाने पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय अल्पसंख्याक उमेदवार पक्ष देणार असेल, तर आपण माघार घेऊ असे इच्छुक उमेदवार व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे सार्दिन यांनाही आपली उमेदवारी नक्की मानता येईना अशी स्थिती तेथे आहे.

भाजप कार्यकर्त्यांना हवा नवा चेहरा

काही महिन्यांपर्यंत श्रीपाद नाईक यांचे नाव आघाडीवर होते, परंतु जसजसे पक्षाचे नेते मत व्यक्त करीत आहेत, तसतसे भाऊंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. पक्षातील एक मोठा गट भाऊंच्या उमेदवारीला विरोध करणारा आहे. नवा चेहरा द्यावा, अशी अपेक्षा अनेकांची आहे. केंद्र सरकारात मंत्री राहिल्यानंतर भाऊंकडून अनेक क्षेत्रात काम करण्यास वाव होता, पण तो काही दिसलाच नाही, असे पक्षाचे कार्यकर्तेच सांगतात.

काँग्रेसच्यावतीने येत्या चार-पाच दिवसांत पक्षाचे उमेदवार जाहीर होतील, अशी आम्हाला आशा आहे. आम आदमी पक्षाबरोबरची बोलणी सकारात्मक झाली असल्याने दोन्ही पक्षाच्या युतीविषयी आणि उमेदवाराविषयी लवकरच संयुक्तपणे माहिती जाहीर केली जाईल.
- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT