Goa Politics: महापौर-उपमहापौरांच्या निवडीचे वेध

Goa Politics: महिन्याचा अवधी: महिला उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा
Panjim Municipal Corporation
Panjim Municipal CorporationDainik Gomantak

Goa Politics: पणजी महापौर-उपमहापौर निवड आता एक महिन्यावर आली आहे. मार्चच्या अखेरीस ही निवड होणार असल्याने यावेळी बदल होण्याची अपेक्षा अनेक नगरसेवकांना वाटत आहे. यावेळी महिलांना या पदावर संधी मिळावी, अशी अपेक्षा निवडून आलेल्या महिला नगरसेवकांना वाटत आहे.

महानगरपालिका निवडणुकीत म्हणजे 2021-22मध्ये आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप पुरस्कृत पॅनलने 30 पैकी 25 जागांवर विजय मिळविला. त्यानंतर काही महिन्यांत अपक्ष म्हणून निवडून आलेला नगरसेवकही मोन्सेरात यांच्या गोटात सामील झाला. त्यामुळे ही संख्या 26 वर पोहोचली.

स्वीकृत दोन नगरसेवक घेतल्याने ती 28 झाली आहे. परंतु पॅनलमधून निवडून आलेल्या 25 मध्ये 11 महिला नगरसेवकांचा सहभाग आहे. त्यातील कॅरिलिना पो यांच्यासारख्या माजी महापौर पुन्हा निवडून आल्या आणि त्यांच्याकडे अनुभवही आहे.

Panjim Municipal Corporation
Goa News: ‘ईएसआय’च्या 40 कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक : मुख्यमंत्री

शिवाय अस्मिता केरकर या उपमहापौर राहिल्याने त्याही अनुभवी आहेत, परंतु इतर महिला नगरसेवक दोन ते तीनवेळा व काही प्रथमच निवडून आलेल्या आहेत.

दोन-तीनवेळा निवडून आलेल्या महिला नगरसेवकांना महापौर किंवा उपमहापौरपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, शेवटी शब्द बाबूश यांचाच असला तरी यावेळी पक्षीय पातळीवरून महिलांना संधी देण्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.

कारण ही निवड लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होत आहे. त्याशिवाय प्रथमच निवडून आलेल्या पुत्रास प्रेमापोटी सलग दोनवेळा महापौर केल्याने अनेकांमध्ये सुप्त असंतोष आहे.

Panjim Municipal Corporation
Goa Politics: ‘एसटीं’ना 2027 पूर्वी आरक्षण

आतापर्यंत महिलांना सत्तेची खुर्ची दूरच

महानगरपालिकेत सध्या सत्ताधारी गटाकडे महिलांमध्ये कॅरिलीना पो, शुभदा शिरगावकर, अस्मिता केरकर, मनीषा मणेरकर, दीक्षा माईणकर, लॉरेन डायस या अनुभवी नगरसेवक आहेत, तर वर्षा शेट्ये, शायनी चोपडेकर,

आदिती चोपडेकर, प्रांजल नाईक आणि सँड्रा कुन्हा या नवख्या नगरसेवक आहेत. त्यामुळे एवढी मोठी संख्या असतानाही महिलांना सत्तेची खुर्ची मिळत नाही आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करताही येत नाही, अशी स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com