Goa Accident Death: धावत्या दुचाकीवरून पडून बोर्डेत एकाचा दुर्दैवी मृत्यू

Goa Accident Death: घेरी आल्याची शक्यता : मृत व्यक्ती उत्तर प्रदेशची
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Death: धावत्या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने एकजण मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना डिचोलीत घडली. हा अपघात आज (शुक्रवारी) सायंकाळी साष्टीवाडा-बोर्डे येथे मुख्य रस्त्यावर घडला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव रामपाल यादव असे असून, तो मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.

सध्या तो मुस्लिमवाडा-डिचोली येथे वास्तव्यास होता. तो मोलमजुरी करीत होता. रामपाल दुचाकीवरून कसा पडला, त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, त्याला घेरी आल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. रामपाल आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून डिचोलीच्या दिशेने येत होता. तो दुचाकीवर मागे बसला होता. साष्टीवाडा-बोर्डे येथे दीनदयाळ सुपर मार्केटसमोर पोचताच रामपाल दुचाकीवरून रस्त्यावर पडला.

Goa Accident Case
Goa Government: राज्य सरकार आता ‘इलेक्शन मोड’वर

108 रुग्णवाहिकेतून लागलीच रामपालला डिचोलीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे जाहीर केले. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. रामपाल याच्या मागे पत्नी आणि तीन लहान मुले असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sai Krishna Custody Death Case
Calangute Resort Death Case
Karnataka Tourist Death Case
Karnataka Tourist Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com