white water rafting goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात लवकरच सुरु होणार व्हाईट वाॅटर राफ्टिंग; गोवा पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार

सत्तरी तालुक्यातील धावे गावातून सदर व्हाईट राफ्टिंगची पहिली फेरी सुरू होणार

गोमन्तक डिजिटल टीम

White Water Rafting Goa : गोवा पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गोवा सरकारच्या व्हाईट वॉटर राफ्टिंगच्या यंदाचा मोसम पुढील आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.

सत्तरी तालुक्यातील धावे गावातून सदर व्हाईट राफ्टिंगची पहिली फेरी सुरू होणार आहे. मात्र, अजुन नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली नाही. त्यामुळे विलंब झाला आहे. मात्र, जर पावसाचा जोर असा कायम राहीला तर पुढच्या आठवड्यापासून हे साहसी व्हाईट वाॅटर राफ्टिंग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.

याबाबतची माहिती अशी की, नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे सत्तरी या ठिकाणी म्हादई नदीच्या प्रवाहावर काही वर्षांपूर्वी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्हाईट वॉटर राफ्टिंग या प्रकल्पाला सुरुवात केली होती.

याला सातत्याने मिळणारा वाढता प्रतिसाद यापार्श्वभूमीवर यंदाही सदर प्रकल्पाच्या पावसाळी मोसमास पुढील आठवड्यापासून प्रारंभ करण्यात येणार आहे. धावे सत्तरी येथून या प्रवासाला सुरुवात करण्यात आल्यानंतर 10 किलोमीटरचे अंतर दीड तासामध्ये पूर्ण करून सावर्डेत समाप्ती करण्यात येत असते. यामुळे पर्यटकांना म्हादई नदीच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेण्याची चांगली संधी निर्माण होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT