Davorlim Dainik Gomantak
गोवा

Davorlim: घरांना क्रमांक कधी देणार? दवर्लीवासियांचा सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

गांधी मार्केट रेडीमेड आणि भाजी विक्रेते असोसिएशनच्या सदस्यांनी नवीन सरकारी कायद्यानुसार दवर्ली पंचायतमध्ये गावातील 145 घरांना घर क्रमांक देण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांचाही याला पाठिंबा आहे.

तर याप्रकरणी दवर्ली सरपंच हर्कुलन नियासो यांनी घर बेकायदेशीर असताना पंचायत घरांना नंबर देऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. 145 अर्जदारांनी घर क्रमांक जारी करण्याबाबत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे त्यांना घर क्रमांक मिळण्यासाठी दवर्ली पंचायतीकडे अर्ज केला होता.

या प्रकरणी आजगावकर म्हणाले, “गोव्याने घर क्रमांक देण्याच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू केली आहे, तर दवर्ली पंचायत या विषयावर दुर्लक्ष करत आहे. पंचायत सचिवांना घर क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जर घर क्रमांक दिले गेले तर रहिवासी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी घर क्रमांक वापरू शकतो,"

ते पुढे म्हणाले की, सर्व घरांना आरोग्य विभागाने दिलेली वीज आणि पाण्याची जोडणी घेतली आहे. सर्व अर्जदार आमच्या गांधी मार्केट व्हेंडर्स असोसिएशनचे सदस्य आहेत. जर पंचायतीला घरांचे क्रमांक जारी करायचे नसतील तर त्यांना निर्णय घेऊ द्या असेही आजगावकर म्हणाले.

तर या प्रकरणी सरपंच हर्कुलन नियासो म्हणाले की, "आम्ही शेतीच्या जमिनीवर उभारलेल्या घरांचे क्रमांक देऊ शकत नाही. ज्यांच्याकडे फॉर्म I आणि XIV सारखी वैध कागदपत्रे तसेच विक्रीपत्र आहेत त्याच घरांना घर क्रमांक देतो. त्यांनी बांधकाम कसे केले आणि आरोग्य विभागाने वीज आणि पाण्याची जोडणी कशी दिली हा मोठा प्रश्न असल्याचे नियासो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

Goa Today's News Live: मायलेकीवर लैंगिक अत्याचार, असोल्डा येथील एकास अटक

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

SCROLL FOR NEXT