Genomic Sequencing Lab in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: लॅब उभारण्याची घोषणा हवेतच, चोडणकरांचा आंदोलनाचा ईशारा, तर ‘आप’कडून मागणी

राज्यात (Goa) कोरोना नियंत्रणात असला तरीही गंभीर स्वरूपाच्या डेल्टा प्लस (Delta Plus) स्ट्रेनची टांगती तलवार गोमंतकीयांच्या डोक्यावर कायम आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात (Goa) कोरोना नियंत्रणात असला तरीही गंभीर स्वरूपाच्या डेल्टा प्लस (Delta Plus) स्ट्रेनची टांगती तलवार गोमंतकीयांच्या डोक्यावर कायम आहे. कारण कोरोना स्ट्रेन व्हेरियंट तपशीलवार तपास व शोध लावणारी ‘जिनोमिक सिकव्हेन्‍सिंग लॅब’ (Genomic Sequencing Lab) गोव्यात नाही. ही लॅब नक्की कधी उभारली जाईल, याबाबत दस्तुरखुद्द आरोग्य यंत्रणाच अनभिज्ञ असल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे. 15 जुलैपर्यंत ही लॅब उभारली गेली नाही, तर आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारला दिला आहे. (When will the Genomic Sequencing Lab be set up in Goa)

जिनोमिक सिकव्हेन्‍सिंग रिपोर्टसाठी पुण्याच्या लॅबमध्ये गोव्यातील नमुने दर 15 दिवसांनी पाठवले जातात. या लॅबमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून येणाऱ्या नमुन्यांची तपासणी केली जाते. एका नमुन्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. त्यामुळे नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्यांहून अधिक अवधी लागतो. मे महिन्यात पाठवलेले अनेक नमुने अद्यापही प्रलंबित आहेत.

राज्यातून आतापर्यंत 122 डेल्टाचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 76 नमुन्यांचा अहवाल मिळाला आहे.रविवारी कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. 164 नवे रूग्ण आढळून आले. रविवारी राज्याला 1 लाख 30 हजार नवे लसीचे डोस मिळाले.

2020 ची घोषणा आठवा

राज्यात जिनोमिक सिक्वेन्सिंग लॅब उभारली जाणार, अशी घोषणा राज्य सरकारने नोव्हेंबर 2020 मध्ये केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा घोषणा करण्यात आली. परंतु, एका महिन्याच्या कालावधीनंतर लॅबसाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. लॅबची जागा ठरली मात्र गाडी कुठे थांबली आहे, हे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही सांगता येत नाही. अशा प्रकारची प्रयोगशाळा राज्यात उघडली तर कोरोना नमुन्यांचे पृथक्‍करण तपशीलवार मिळेल. त्याआधारे उपचार पद्धतीत बदल करता येईल. रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

उपचारासाठी होते मदत

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्हायरालॉजी व जिनोम सिक्‍वेन्सिंग लॅबची नितांत गरज आहे. कारण, नमुन्यांच्या अहवालावरून उपचार करणे सोपे होते. राज्यात ही सुविधा उपलब्ध झाल्यास अहवाल लवकर मिळतील. उपचारांची दिशा आणि संसर्गाचा वेळ ठरवण्यासाठी मदत होईल, असे कोविड इस्पितळाच्या एका डॉक्टरने सांगितले.

तर आम्ही आंदोलन करू : चोडणकर

डेल्टा प्लस व्हेरियंट तपासणी करणारी लॅब त्वरित स्थापन करा; अन्यथा काँग्रेस आंदोलन करणार, असा इशारा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. डेल्टा प्लसचा विषाणू शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे. हा विषाणू फक्त जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे ओळखला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भाजप सरकारने कोविड रुग्णांची हत्या केली. ज्यामुळे 3 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता तरी लवकरात लवकर आरोग्य सुविधा निर्माण करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘आप’कडूनही लॅबची मागणी

राज्यात मोठ्या प्रमाणात मजूर रेल्वेद्वारे येत आहेत. त्यांना बसमध्ये भरून म्हापसा व मडगावमध्ये नेले जाते. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची अँटिजेन चाचणी केली जाते. मात्र, सर्वच कामगारांची चाचणी होत नाही. ही गोष्ट आम आदमी पक्षाने सरकारच्या निदर्शनास आणली होती, मात्र त्यावर काहीही झाले नाही. मुख्यमंत्री केवळ देखावा करतात. महिनाभरात लॅब उभारू, असे सरकार सांगते मात्र त्यावर कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही, असे ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे.

झारीतल्या शुक्राचार्याचा शोध

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने विविध प्रकारचे प्रयत्न केले. त्यापैकीच ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञाला नेव्हीच्या खास विमानाने गोव्यात आणण्यात आले होते. त्यांनी लॅब उभारण्याची सूचना केली होती. या सूचनेबाबत टाळाटाळ करणारा तो अधिकारी कोण? हा आता महत्त्वाचा विषय बनला आहे. गोव्यात व्हायरालॉजी लॅब वेळेत झाली असती तर मे महिन्यात झालेल्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT