Goa Covid-19: रिकव्हरी रेट 96.92 टक्यांवर, 12 दिवसांत 1,99,918 गोवेकरांचे लसीकरण

गोवा (Goa) राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 3.56 टक्क्यांवर आला असून, हा चार महिन्यांतील सर्वांत कमी दर आहे
Goa Covid-19 update
Goa Covid-19 updateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 3.56 टक्क्यांवर आला असून, हा चार महिन्यांतील सर्वांत कमी दर आहे. दुसरीकडे गेल्या चार दिवसांत 16,194 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून 747 नवे कोरोना बाधित आढळून आले. (1,99,918 people were vaccinated in 12 days In Goa)

रुग्‍ण बरे होणाऱ्यांची टक्केवारी 96.92 टक्के झाली आहे. रविवारी 164 नवे रुग्ण आढळून आले, तर चौघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या आता 3,073 झाली आहे. राज्यात 2,087 सक्रिय रुग्ण असून, मडगाव, फोंडा व कुठ्ठाळी येथे 100 च्यावर तर इतर 31 ठिकाणी कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आहेत.

Goa Covid-19 update
Goa Curfew: संचारबंदीची नवी अधिसूचना जारी, हॉटेलचालक खुश तर कसिनो बंदच
Goa Covid-19 update
Goa: मोपा परिसरातील इंटटेटमेंट झोन कुणासाठी : आपचा सवाल

राज्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 23 जून ते 4 जुलै या 12 दिवसांच्या कालावधीत तब्बल 1,99,918 एवढे लसीकरण झाले. सर्वांत जास्त म्हणजे 23,036 एवढे लसीकरण 29 जून रोजी झाले होते. रविवारी 10,927 जणांनी लस घेतली. त्यात 7,709 जणांनी पहिला डोस, तर 3,218 जणांनी दुसरा डोस घेतला. आत्तापर्यंत 9,75,204 एवढे लसीकरण झाले असून, त्यातील 7,16,438 जणांनी पहिला, तर 1,29, 383जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com