Goa Curfew: संचारबंदीची नवी अधिसूचना जारी, हॉटेलचालक खुश तर कसिनो बंदच

गोवा (Goa) सरकारने 9 मे 2021 रोजी लावलेली संचारबंदी आणि कर्फू (Goa Curfew) आज पाचव्‍यांदा वाढवला. त्यानुसार आज दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे.
New guideline of curfew in Goa
New guideline of curfew in GoaDainik Gomantak

पणजी: गोवा (Goa) सरकारने 9 मे 2021 रोजी लावलेली संचारबंदी तथा कर्फू (Curfew) आज पाचव्‍यांदा वाढवला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दोन दिवसापुर्वी राज्यात कोरोनासह डेल्टा प्लस व्हेरियंट चे संकट असल्यामळे सुरु असलेली व आज संपणारी संचारबंदी 12 जुलैपर्यंत वाढवणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार आज दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे. (Goa Curfew: The government has allowed hotels and restaurants to open from 7 am to 9 pm)

त्यात आज ता. 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजता संपणारी संचारबंदी 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्ययत वाढवण्यात आली असून यापुर्वी फक्त पार्सल देण्याची परवानगी असलेल्या हॉटेल व बार रेस्टारेंटना 50 टक्के ग्राहक बसवून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

New guideline of curfew in Goa
Goa: सर्वण बस थांब्यावर अखेर बसविला 'व्ह्यू मिरर'

त्याचबरोबर 9 मे पासून बंद असलेली सलून (केस कर्तनालये) व उघड्यावरील क्रिडा संकुले सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुर्वी सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंतच दुकाने व अस्थापने खुली करण्याची परवानगी होती. ती वेळ आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आली असून रेस्टारेंटना रात्रीच्यावेळी किचन सुरु ठेऊन पार्सल देण्याची परवानगी असणार आहे.

कसिनो, जलतरण तलाव, आठवडी बाजार बंदच राहतील

राज्यातील बहुतांश व्यवहार उद्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत खुले राहणार आहेत. राज्यातील कारखाने दिवसभर चालू ठेवण्याची परवानगी यापुर्वीच दिलेली आहे. मात्र कसिनो, जलतरण तलाव, सिनेमा थियेटर, जीम व आठवडी बाजार पुढील काही दिवस बंदच राहणार आहेत. इतर व्यवहार खुले ठेवण्याची परावानगी असली तरी कोरोना नियमावलीचे पालन, तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग हे नियम पळावे लागणार आहेत. १४४ कलम लावलेले असल ५ पेक्षा जास्त लोकांनी परवानगी शिवाय एकत्र जमता येणार नाही. परराज्यातील नागरिकांना ७२ तासाचे नेगटीव्ह प्रमाणात गोव्यात येण्यासाठी पात्र ठरेल.

New guideline of curfew in Goa
Goa: 'एक दिस शेतान', रेवोलूशनरी गोवन्सचा अभिनव उपक्रम

डोक्यावरील ओझे होणार कमी

राज्यातील सलून दोन महिने बंद राहिल्यामुळे अनेकंचे केस वाढलेले आहेत. काही नागरिक अमूक दुकानातील ठरलेल्या व्यक्तीकडूनच केस कापून घेत असतात, त्यांमुळे अनेकांच्या डोक्यावर केस वाढलेले आहेत. उद्यापासून ते कापण्यासाठी सलूनमध्ये गर्दी होणार असून लोकांच्या डोक्यावरचे केसांचे ओझे कमी होणार आहे.

हॉटेलचालक खुश

राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची सरकारने परवानगी दिली. फार बरे झाले. दडपण कमी झाले. नियम पाळून व्यवसाय करु.

-- रमाकांत नाईक (हॉटेल चालक, साखळी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com