Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: कोण, कधी, कुठे? मोपा विमानतळाबाबत सर्व प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी दिली उत्तरे

मोपा कोणाचे नाव दिले जाणार याबाबत सस्पेन्स कायम

Pramod Yadav

गोव्यात नव्याने झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mopa Internatioanl Airport) उद्धाटन कधी होणार, कोण करणार आणि विमानतळाला कुणाचे नाव दिले जाणार? असे प्रश्न सध्या गोमंतकीयाना पडले आहेत. मोपाचे संपूर्ण काम झाले नाही तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उद्धाटनाची घाई का लागली आहे? याबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, सर्व उलट-सुलट चर्चेनंतर अखेर मोपाच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून, लवकरच विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. मोपा विमानतळाबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली आहेत.

मोपा उद्धाटनाचा कार्यक्रम, काय म्हणाले मुख्यमंत्री?

गोव्यात होणाऱ्या नवव्या आयुर्वेदिक काँग्रेसच्या सांगता समारंभाला 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. यासाठी जवळपास पाच हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यात 200 परदेशी प्रतिनिधींचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी धारगळ येथील आयुष हॉस्पिटल आणि इतर दोन प्रकल्पांचे अभासी पद्धतीने उद्धाटन करतील.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील उद्धाटन करणार आहेत. मोपा विमानतळावरील विमान सेवा पाच जानेवारीपासून सुरू होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मोपाची पहिली फेज 100 टक्के पूर्ण झाली आहे.

मोपाला नाव कोणाचे?

मोपा विमानतळाला कोणाचे नाव दिले जाणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, याबाबत प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आल्याची माहिती राज्य सरकराने दिली आहे. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांचे नाव विमानतळाला देणार का? याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणे टाळले. त्यामुळे मोपा कोणाचे नाव दिले जाणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT