गोव्याला पाणीपुरवठा होणारा तिलारी कालवा (Tillari Canal) तब्बल 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच बंद होणार आहे. मागील 22 वर्षात डागडुजी न झाल्याने डावा आणि उजवा कालवा तब्बल दोन महिन्यांसाठी बंद ठेवला जाणार आहे. मात्र, याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही. पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती गोवा जलसंपदा विभागाने (Goa WRD) दिली आहे.
दरम्यान, तिलारी कालव्यातून शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा डिसेंबरनंतर सुरू होणार आहे. तसेच पेडणे, डिचोली आणि बार्देश (Pernem, Bicholim and Bardez) तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर देखील काही परिणाम होणार नाही. अशी माहिती देखील जलसंपदा विभागाने (Goa WRD) दिली आहे. बार्देश तालुक्यासाठी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी खाते काळजी घेत आहे. तसेच पेडणे तालुक्यात पाणी चांदेल येथून घेतले जाणार आहे.
तिलारी कालव्याच्या दुरूस्तीचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने केले जाणार आहे. तिलारी धरण महाराष्ट्रात असल्याने कालव्याच्या कामाचा खर्च महाराष्ट्र करणार आहे. कालव्याच्या डागडुजीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो मात्र, महाराष्ट्र सरकाने कालव्याच्या दुरूस्तीकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने वेळेत डागडुजी न केल्याचे स्थानिक म्हणत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.