Sonali Phogat Death Case: टिक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने गोव्यातील तपास पूर्ण करत परतली. दरम्यान, या प्रकरणाची म्हापसा न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत महत्वाची अपडेट समोर आली असून, गोवा पोलिसांसह (Goa Police) सीबीआयच्या (CBI) तपास अधिकाऱ्यांना देखील न्यायालयाने पुढच्या सुनावणीसाठी महत्वाचे निर्देश दिले आहेत.
म्हापसा न्यायालायाची आजची सुनावणी
म्हापसा न्यायालयात (Mapusa Court) आज (सोमवारी) सोनाली फोगाट हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. यात न्यायालयाने फोगाट हत्या (Sonali Phogat Death Case) प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संशयित आरोपींना न्यायालयात का हजर केले नाही यासाठी म्हापसा न्यायालयाने कोलवाळ तुरूंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच, पुढील सुनावाणीवेळी सीबीआय तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
सोनाली फोगाट हत्या प्रकरणी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि स्टाफ मधील सहकारी सुखविंदर पाल सिंग (Sukhwinder Singh & Sudhir Sangwan) यांना 25 ऑगस्ट रोजी गोवा पोलिसांनी अटक केली. गोवा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली फोगाट कुटुंबियांनी केली. सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आल्यानंतर, 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील सीबीआय पथक तपासासाठी गोव्यात दाखल झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.