Dam Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'अभ्यास न करताच नवीन बंधारा बांधण्याचे प्रयोजन काय?'

जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वळंडव-काले येथे नवीन बंधारा बांधण्यासाठी स्थानिक आमदार गणेश गावकर यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वळंडव-काले येथे नवीन बंधारा बांधण्यासाठी स्थानिक आमदार गणेश गावकर यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली आहे.

कुठल्याही तांत्रिक आणि भौतिक गोष्टींचा अभ्यास न करताच हा बंधारा बांधायचे प्रायोजन आणि नियोजन करण्यात आलेले आहे, असा आरोप शेतकरी तथा शिरोड्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर यांनी केला आहे.

पत्रकाराशी बोलताना जयदीप म्हणाले की, ज्या जागेत हा बंधारा बांधण्यात येणार आहे, त्या बंधाऱ्यापासून वरच्या बाजूला फक्त दोनशे ते तीनशे मीटरवर माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत दहा ते बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला असून तो बंधारा आजपर्यंत उपयोगात आणला जात आहे.

असे असतानाही पूर्वीच्या बांधाऱ्याखाली फक्त दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर नवीन बंधारा बांधण्याचे प्रयोजन काय? हे एक मोठे कोडे आहे किंवा त्यात मोठा भ्रष्टाचार आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हा बंधारा उभारून अस्तित्वात आला, तर त्याचे गंभीर आणि वाईट परिणाम संभाव्य बांधाऱ्याच्या वरच्या बाजूच्या शेतकऱ्यांना तसेच आजूबाजूच्या जनतेला यापुढेही भोगावे लागणार आहेत.

या संभाव्य बंधाऱ्यामुळे खास करून पावसाळ्यात या भागातील जनतेचे आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे याचे सरकारने आणि जलसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांनी भान ठेवावे.

आपली ढोबळ कार्यक्षमता लपविण्यासाठी तसेच जलसंवर्धन खात्याचे मंत्री या नात्याने आपण कशाप्रकारे कार्यक्षमरित्या काम करतो असे जनतेला भासवण्यासाठी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिशाभूल करण्यासाठी या भागातील शेतकरी आणि बागयातदार यांचे नुकसान करून जलसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांनी या भागातील जनतेचे नुकसान करू नये, असेही जयदीप शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT