सध्या सोशल मीडियावर एक ग्राफिक प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. गोव्यातील वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे गोव्यातील दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) च्या विद्यार्थिनींना बिकिनी घालून शाळेत येण्याची शाळा प्रशासनाने परवानगी दिली आहे. असा दावा एका ग्राफिकच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे? त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे ग्राफिक सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. या ग्राफिकमध्ये पांढऱ्या रंगाची बिकिनी दिसत आहे, ज्यावर दिल्ली पब्लिक स्कूलचा लोगोही दिसत आहे.
ग्राफिकमध्ये एक टेक्स्ट आहे ज्यात, 'DPS गोवा शाळेने उन्हाळ्यात मुलींना गणवेश म्हणून बिकिनी घालण्याची परवानगी दिली आहे. कारण गोव्यातील हवामान उष्ण आणि दमट आहे' असे लिहिले आहे. ग्राफिकमध्ये मजकुराच्या वर The Katwa India आणि तळाशी The Katwa India चा लोगो आहे. ही पोस्ट 29 मार्च 2023 रोजी शेअर करण्यात आली आहे.
व्हायरल पोस्टचे सत्य काय?
दरम्यान, या व्हायरल ग्राफिकमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. वास्तविक, हा ग्राफिक सर्वप्रथम द कटवा इंडिया नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून अपलोड करण्यात आला होता, ज्याचा लोगो ग्राफिकमध्ये आहे. द कटवा इंडिया हे पृष्ठ नियमितपणे व्यंगात्मक बातम्या पोस्ट करते, ज्याचा वास्तविक घटनांशी काहीही संबंध नाही.
द कटवा इंडियाने काही आठवड्यांपूर्वी पोस्ट केलेल्या त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या खात्यावर पोस्ट केलेल्या सर्व पोस्ट आणि बातम्या खऱ्या नाहीत, त्या व्यंग आणि विडंबन करण्याच्या हेतूने केल्या आहेत, कृपया हे पृष्ठ गंभीरपणे घेऊ नका. असे या स्टोरीमध्ये लिहिले आहे.
गोव्यात दिल्ली पब्लिक स्कूलच नाही!
गंमत म्हणजे गोव्यात दिल्ली पब्लिक स्कूल अशी कोणती शाळाचा अस्तित्वात नाही. डीपीएस वेबसाइटवरील शाळांची यादी देखील तपासली असता, त्यात देखील याबाबत कोणतीही माहिती आढळली नाही. त्यामुळे या पोस्टमधून करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.