गोवा, कोची नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड्सचे होणार आधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाचा 470 कोटी रुपयांचा करार

या अंतर्गत सुमारे तीन वर्षांसाठी 1.8 लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.
Ministry of Defence
Ministry of DefenceDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा आणि कोची येथील नेव्हल एअरक्राफ्ट यार्डमध्ये नौदलाची विमाने, एरो इंजिन, रोटेबल्स आणि चाचणी उपकरणांची दुरुस्ती केली जाते. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (31 मार्च रोजी) विशाखापट्टणम स्थित अल्ट्रा डायमेंशन्स प्रा. लि. कंपनीसोबत 470 कोटी रुपयांचा करार केलाय. नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड्स (NAYs) च्या आधुनिकीकरणासाठी हा करार केला आहे.

(The Ministry of Defence signed a contract for the modernisation of Naval Aircraft Yards at Goa & Kochi, at a cost of Rs 470 crore)

नेव्हल एअरक्राफ्ट यार्डमध्ये सध्याची आणि भविष्यातील विमान वाहतूक तसेच, देखभाल संबधित आव्हानांना तोंड देण्यासाठी सुविधांचे आधुनिकीकरण आवश्यक आहे. याशिवाय तांत्रिक आणि क्षमता यातील अंतर भरून काढण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती गरजेची आहे.

आधुनिकीकरणामध्ये स्वयंचलित मशिनरी आणि कंपोझिट रिपेअरसह दुरुस्ती सुविधांचा समावेश आहे. या अंतर्गत सुमारे तीन वर्षांसाठी 1.8 लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

Ministry of Defence
Delhi Airport: दिल्ली विमानतळावर Emergency घोषित, FedEx विमान पक्ष्याला धडकल्यानंतर घेतला निर्णय

याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. आधुनिकीकरणामुळे नौदल एव्हिएशन प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता वाढेल आणि दुरुस्तीसाठी बाह्य एजन्सी तसेच, परदेशी उपकरण उत्पादक (OEM) वरील अवलंबित्व कमी होईल. ‘आत्मनिर्भर भारत’चा हा अभिमानास्पद प्रकल्प आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाने मेकॉन लिमिटेड, रांची यांच्याशी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी 24 कोटी रुपये खर्चासाठी करार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com