MLA Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोव्याबाबत भारतीय काय विचार करतात? आमदाराने अधिवेशनात सांगितला मजेशीर किस्सा

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: जीत आरोलकर पर्यटनविभागाबाबतच्या कपात सूचनांना विरोध करताना मागण्यांवर बोलत होते.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाच्या कपात सूचना आणि मागण्यावर बोलत असताना मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. भारतीय लोक गोव्याबाबत काय विचार करतात? हे सांगत असताना आरोलकरांनी एक मजेशीर उदाहरण सांगितले.

गोव्याची पर्यटन प्रसिद्धी करत असताना घ्यायच्या काळजी आणि त्याबाबत सूचना करताना जीत आरोलकरांनी एक किस्सा सांगितला. आरोलकर म्हणाले, मी देहरादून येथे मित्राला भेटण्यासाठी गेलो होते.

"यावेळी त्या मित्राची आई गोव्याचे कौतुक करत होती. गोवा खूप चांगला आहे मी देखील पतीसोबत गोव्यात येण्याचे नियोजन केले होते. पण आमच्या मुलांनी ती ट्रीप रद्द केली. तुमचे गोव्याला जाण्याचे वय आहे का? गोव्याला तरुण जातात मौजमजा करण्यासाठी, तुम्हा कशासाठी जाताय?"

असा किस्सा आरोलकरांनी सांगितला. यावरुन गोव्याबाबत सामान्य भारतीय काय विचार करतात याचा राज्य सरकारने विचार करायला हवा, असे आरोलकर म्हणाले.

जीत आरोलकर पर्यटनविभागाबाबतच्या कपात सूचनांना विरोध करताना मागण्यांवर बोलत होत. गोव्याचे Visual Branding केल्यास त्याचा फायदा होईल, असे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर म्हणाले.

गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांवर भाष्य करताना त्यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे लक्ष वेधून घेत, वरील किस्सा सांगितला. तसेच, याबाबत गांभीर्याने विचार करुन हा विचार बदलण्याची गरज असल्याचे आरोलकर म्हणाले.

खंवटे यांच्या विभागाबाबत बोलताना विविध आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मागण्या मांडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT