King Cobra 
गोवा

King Cobra: पश्चिम घाटातील किंग कोब्रा नवी प्रजाती; अभ्यासातून माहिती समोर

Western Ghat King Cobra: नव्या शोधामुळे किंग कोब्रांचा नैसर्गिक अधिवास संरक्षित करण्यात मदत होणार आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील पश्चिम घाटाच्या जंगलात सापडणारा किंग कोब्रा या विषारी सापाची नवी प्रजाती म्हणून ओळख पटली आहे. पी गौरी शंकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने हा शोध लावला आहे.

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या दक्षिण पश्चिम घाटात ओफिओफॅगस कालिंगा sp.nov ही नवीन प्रजाती ओळखली आहे.

२०२४ मधील एका प्रसिद्ध अभ्यासानुसार, किंग कोब्राच्या चार प्रजाती असल्याचे समोर आले आहे. ओफिओफॅगस हना (उत्तरी भागातील कोब्रा) याशिवाय संशोधकांना अंडा किंग कोब्रा (ओ. बंगारुस), पश्चिम घाट किंग कोब्रा (ओ. कलिंगा) आणि लुझोन किंग कोब्रा ( ओ. सल्वात्ना) यांचा समावेश आहे.

दक्षिण पश्चिम घाटात सापडणारा किंग कोब्रा नवी प्रजाती असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे, ही आनंदाची बाब आहे, असे डिचोलीतील एका वन्यजीव अभ्यासकाने म्हटले आहे.

नव्या शोधामुळे किंग कोब्रांचा नैसर्गिक अधिवास संरक्षित करण्यात मदत होणार आहे. गोव्यात गेल्या काही वर्षात किंग कोब्रा आणि माणसांमध्ये वाद पाहायला मिळाला आहे. पश्चिम घाटातील कोब्रा खूप लांब वाढतो, जवळपास १० फूट लांब किंग कोब्राची वाढ होऊ शकते, असे जाणकार सांगतात.

कर्नाटकमध्ये याला कलिंगा म्हणतात तर गोमंतकीय लोकगीतांमध्ये त्याचा भुजंग असा उल्लेख आहे. किंग कोब्रा मुख्यत्वे त्याच्या प्रजातींच्या सापांची शिकार करतो. म्हादई वन्यजीव अभयारण्य परिसरात काजू बागांमधून त्यांची अनेकवेळा सुटका केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT