Valpoi Market 
गोवा

Valpoi Market: वाळपईत व्यापारी, ग्राहक वाढले; बाजारासाठी जागा अपुरी

Valpoi Market:अनेक वर्षापासून वाळपईत मंगळवारी आठवडा बाजार भरत आहे. पूर्वी हा बाजार मासोर्डे गावात जाणाऱ्या एकाच रस्त्यावर भरत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपईत येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी सध्या जागा अपुरी पडू लागली आहे. संपूर्ण सत्तरी तालुक्यासाठी वाळपई ही एक प्रमुख बाजारपेठ असून आठवडा बाजाराला येथे मोठी गर्दी उसळते. व्यापारी तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे या बाजाराचा आता खुल्या जागेत विस्तार होणे आवश्‍यक झाले आहे.

अनेक वर्षापासून वाळपईत मंगळवारी आठवडा बाजार भरत आहे. पूर्वी हा बाजार मासोर्डे गावात जाणाऱ्या एकाच रस्त्यावर भरत होता. सर्व प्रकारचे व्यापारी एकाच रस्त्यालगत बसून व्यवसाय करीत होते. पण मागील दहा वर्षांपासून या बाजाराचे विभाजन झाले आहे.

मुख्य बाजारपेठ ते पालिका मैदानाच्या रस्त्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सध्या हा बाजार भरतो. मासोर्डे गावच्या रस्त्यावरील मार्गावर केवळ कपडे, चप्पल, बँग या व्यावसायिकांना जागा दिली आहे. फळे, भाजी व्यावसायिकांना वाळपई पालिका मैदानाच्या ठाणे रस्ता मार्गावरील रस्त्यालगत बसविले जाते.

शौचालय, पाण्याची गैरसोय

आठवडा बाजार सुयोग्य जागेत हलविल्यास येथील वाहतूक कोंडी व अन्य समस्या सुटण्यास मदत होणार आहे. सध्या बाजारात शौचालय, पाणी आदीची गैरसोय आहे. परराज्यातून बरेच व्यावसायीक वाळपईत येतात, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय योजणे आवश्‍यक आहे.

गटारांच्या लाद्यांवर बसून व्यापार

येथील आठवडा बाजाराची पालिकेने आपल्या सोयीनुसार विभागणी केली असली तरी आजही हा बाजार बेशिस्तपणे भरतो. रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरत असल्याने गटारांच्या लाद्यांवर बसून विक्रेत्यांना व्यापार करावा लागतो.

हे व्यापारी तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. त्यामुळे आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा गरजेची आहे.

होंडा, साखळी आदी ठिकाणी आठवडी बाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केलेली आहे. या बाजारात व्यापारी तसेच ग्राहकांसाठी मोकळेपणे व्यापार करता येतो, परंतु वाळपई ही स्थिती नाही. आठवडा बाजाराच्या दिवशी उसळणारी गर्दीमुळे येथील बेशिस्तीत अधिक भर पडते. त्यामुळे आठवड्याच्या बाजाराला नवे रूप देण्याची गरज आहे.

आठवडा बाजारासाठी स्वतंत्र जागा हवी

रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही होतो. पार्किंगची गैरसोय, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आदी समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यात या बाजारात भटक्या गुरांचीही मोठी समस्या आहे.

त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला भरणाऱ्या आठवडा बाजाराबाबत नव्याने विचार करणे आवश्‍यक झाले आहे.

हा बाजार शहरालगत स्वतंत्र जागेत हलवणे वा बाणास्तारी येथील आठवडी बाजारासाठी उभारलेल्या स्वतंत्र संकुलाप्रमाणे बाजार संकुल उभारणे हे पर्याय पालिकेसमोर आहेत. पालिकेने यावर गांभिर्याने विचार करणे आवश्‍यक आहे, अशी व्यापारी व ग्राहकवर्गाची अपेक्षा आहे.

उभारणे आवश्‍यक झाले आहे. त्या ठिकाणी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय आदी निर्माण करता येईल. तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील. पालिका तसेच सरकारने यावर गांभिर्याने विचार करणे आवश्‍यक आहे , असे ग्राहक ॲड. शिवाजी देसाई म्हणाले.

गरमीच्या दिवसांत रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणे प्रचंड त्रासदायक ठरते. व्यापारी तसेच ग्राहकांचीही संख्या सध्या वाढलेली आहे. या बाजारासाठी आता स्वतंत्र जागा आवश्‍यक झाली आहे. जेणे करून ग्राहकांना खुल्या जागेत मोकळेपणे खरेदी करता येईल, असे कापड विक्रेते रमेश शिडगावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT