Illegal Transport
Illegal TransportDainik Gomantak

Bicholim: खनिज वाहतुकीला वाढता विरोध, पिळगावात शेतकरी आक्रमक; दोन ठिकाणी रस्‍त्‍यात काटेरी कुंपण

Bicholim Mine Ore Transport: पिळगाव कोमुनिदादने आक्रमक पवित्रा घेत स्थानिकांच्या मदतीने पिळगाव-सारमानस जंक्शनवर न्यू प्लांटजवळील खाणीवरील रस्ता काटेरी कुंपण घालून अडविला आहे.
Published on

Bicholim Mine Ore Transport

खाण कर्मचारी, शेतकऱ्यांपाठोपाठ आता पिळगाव कोमुनिदादनेही सेझा (वेदान्‍ता) खाण कंपनीविरोधात दंड थोपटले आहेत. कोमुनिदादसह गावातील प्रश्‍‍न आणि समस्या सोडवा, अन्यथा आमची मालमत्ता आम्हाला परत करा, अशी मागणी करत पिळगाव कोमुनिदादने आक्रमक पवित्रा घेत स्थानिकांच्या मदतीने पिळगाव-सारमानस जंक्शनवर न्यू प्लांटजवळील खाणीवरील रस्ता काटेरी कुंपण घालून अडविला आहे.

खाणीवरून जाणारा रस्ता सर्व्हे नं. २७/० आणि १५८/० अशा दोन ठिकाणी बंद करण्‍यात आला आहे. ही जागा आमची मालमत्ता आहे, असा दावा कोमुनिदादने केला आहे. खाण कंपनीने काढून टाकलेल्या कामगारांच्या भवितव्याचा विचार करावा, कोमुनिदादसह शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून गावाचे हित जपावे या मागण्‍यांसाठी शेतकरी संघटित झाले असतानाच आता कोमुनिदादनेही दंड थोपटले आहेत.

त्यामुळे खाण कंपनीसमोर नव्याने पेच निर्माण झाला आहे. कोमुनिदादचे मुखत्यार नरेंद्र प्रभुगावकर, पिळगावच्या श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक परब गावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सर्व्हे रस्ता अडवला.

अडविलेली जागा लागवडीखाली आणू

खाण कंपनीकडून स्थानिकांवर अन्याय होत असेल आणि कंपनीला गावाचे काहीच पडलेले नसेल तर कोमुनिदादची जागा कंपनीसाठी का म्हणून सोडावी? असा प्रश्‍‍न पुंडलिक परब गावकर यांनी उपस्‍थित केला. खाण कंपनी जोपर्यंत गावचे हित जपत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अडविण्यात आलेली जागा लागवडीखाली आणण्यात येईल, असे नरेंद्र प्रभुगावकर यांनी सांगितले.

Illegal Transport
Summer Heat: यंदाचा उन्हाळा अतिशय उष्ण; गोव्यात एप्रिलमध्ये 1-2 दिवस उष्ण लाटेची शक्यता

आमची शेतजमीन पूर्ववत करून द्या

सेझा (वेदान्‍ता) खाण कंपनीविरोधात सारमानस-पिळगाव भागातील शेतकरी यापूर्वीच संघटित झाले आहेत. खाणींमुळे उद्‌ध्‍वस्त झालेली आमची शेती सुपीक करून पूर्ववत आम्हाला द्या, अशी मागणी करत पिळगावमधील शेतकरी संघटित झाले आहेत.

त्‍यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सारमानस भागात खनिज वाहतुकीसाठी तयार केलेला खाणीवरील अंतर्गत रस्ता अडवला आहे. पुन्हा शेती व्यवसाय केल्यास संसार चालविण्यास हातभार लागेल असे त्‍यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com