Siolim Heritage Tree Cutting: शिवोलीत 150 वर्षांहून जुन्या झाडांची कत्तल, वन खात्‍याला चौकशीची सूचना

Siolim Heritage Tree Cutting: न्यायालयाने रेंज फॉरेस्ट ऑफिसरला चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.
Siolim Heritage Tree Cutting
Siolim Heritage Tree CuttingDainik Gomantak

Siolim Heritage Tree Cutting

शिवोली येथे रस्ता रुंदीकरणासाठी कोणत्याही खात्याची परवानगी न घेता दीडशे वर्षांहून जुन्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी कंत्राटदाराने न्यायालयास आपणास ही झाडे तोडण्यास कुणी सांगितले, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.

न्यायालयाने रेंज फॉरेस्ट ऑफिसरला चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

शिवोली येथे रस्त्यालगत असलेली जुनी झाडे तोडण्यात आली असून, संबंधित झाडे कापण्याआधी चिन्हांकीतही केली नव्हती. या प्रकरणी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दरम्यान, शिवोली परिसरातील झाडे आपल्या सूचनेनुसार तोडण्यात आली, अशी क्लीप व इतर पुरावे याचिकादाराने न्यायालयात लोबोंच्या विरोधात सादर केले. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने आमदार मायकल लोबोंना प्रतिवादी बनवले आहे.

या प्रकरणी स्थानिकांनी वेळोवेळी आंदोलन करून वृक्षतोडीचा निषेध नोंदविला होता. रस्‍ता रुंदीकरणावरून येथील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com