Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

'त्या' सर्व ठिकाणांचा कायापालट करणार: सुदिन ढवळीकर

फर्मागुढी-फोंड्यात आज शनिवारी मगो पक्षाच्या (MGP) वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

फोंडा: सत्तेत आल्यास केवळ फर्मागुढीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा संदर्भ असलेल्या गोव्यातील सर्वच ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या कायापालट करू अशी घोषणा मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केली. फर्मागुढी-फोंड्यात आज शनिवारी मगो पक्षाच्या (MGP) वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ढवळीकर यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच राजेश नाईक, कवळे सरपंच राजेश कवळेकर, मडकई सरपंच लक्ष्मी तारी वळवईकर, प्रोबस क्लबचे अध्यक्ष जयवंत आडपईकर तसेच इतर सरपंच, पंचसदस्य व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ढवळीकर म्हणाले, शिवछत्रपतींचा आदर्श आज प्रत्येकाने घेणे आवश्‍यक असून स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांनी केलेले नियोजन आणि शत्रूंवर मिळवलेला विजय हा आज युवा पिढीला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक वस्तुपाठ आहे.

मगो युतीचे सरकार सत्तेवर आले तर सर्वप्रथम फर्मागुढीतील शिवाजी महाराज किल्ल्याचे नूतनीकरण व पर्यटनदृष्ट्या सौंदर्यीकरण कामाला एका महिन्यात सुरवात करण्यात येईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या भाजप सरकारनेच या कामात खो घातल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे बांदोडा येथील सरपंच राजेश नाईक यांनी शिवजयंती सोहळ्याबद्दल पंचायतीला कळवले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे बांदोडा पंचायतीला शासकीय शिवजयंती कार्यक्रमासंबंधी कोणतीच माहिती देण्यात आली नाही. वास्तविक हा किल्ला हा बांदोडा पंचायतीच्या अखत्यारित येतो. पण कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही दिले नाही. सरकारने स्वतः देखभाल यंत्रणा उभारावी किंवा बांदोडा पंचायतीला देखभालीसाठी कळवावे असे आवाहन नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT