भाजपची कर्मचाऱ्यांना पैशांची ऑफर; गिरीश चोडणकर यांचा आरोप

काँग्रेसचा भाजपवर आरोप : बॅलेट मतदानावरून तापले वातावरण
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak

पणजी:  विधानसभा निवडणूकीत हरणार या भीतीने गोंधळलेल्या भाजप बॅलेट मतदानासाठी दहा  हजार  रुपयांची  ऑफर  देत आहे. मतदारांची  तपशीलवार  यादी  मिळविण्यासाठी  भाजपने  ‘पोलिस  वायरलेस  सेवे’चा गैर वापर  केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष  गिरीश  चोडणकर (Girish Chodankar) यांनी शनिवारी केला.   निवडणूक  आयोगाने  याची चौकशी  करून  कारवाई  करावी, अशी  मागणी त्यांनी  केली.  (Goa News)

Girish Chodankar
संपूर्ण यात्रेतून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार; श्रीधरन पिल्लई

चोडणकर यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपला धक्का बसला आहे. प्रमोद सावंत आणि भाजप नेत्यांनी.अधिकृत वायरलेस पाठवून पोस्टल बॅलेट निवडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. राजकारणाच्या हेतूने ते अधिकृत वायरलेस कसे वापरू शकतात असा प्रश्न त्यांनी केला.

भाजपच्या (BJP) बाजूने मतदान करण्यासाठी पोलिस आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांची ऑफर दिली जाते, आरोप त्यांनी केला. ज्या मतदारसंघात थोड्याशा फरकाने कोणीही जिंकू शकतो अशी परिस्थिती असते, तिथेच पोस्टल मतदान महत्त्वाची भूमिका जावते. त्यामुळे या मतदारांना ओळखून त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने गोव्याची लोकशाही आधीच उद्ध्वस्त केली आहे. आता ते मतदारांना पैसे देऊन पोस्टल बॅलेटचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने बॅलेट पेपरसाठी अर्ज केलेल्या पोलिसांची संख्या आणि मतदान केलेले आणि अद्याप मतदान करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या याबद्दल माहिती मागवली आहे. आम्ही या घटनेबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी करू असे चोडणकर म्हणाले.

आयोगाचा पक्षपातीपणा

चोडणकर यांनी पत्रपरिषदेत निवडणूक आयोगावरही (Election Commission) निशाणा साधला. प्रमोद सावंत मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर करत आहेत. शिवाय आयोगाने फक्त भाजपलाच त्यांचे होर्डिंग लावण्याची परवानगी का दिली आणि इतर पक्षांना का दिली नाही? निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत आहे असा आरोप त्यांनी केला.

पक्षांतरासाठी दबाव

प्रमोद सावंत, विश्वजीत राणे आणि माविन गुदिन्हो हे भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजूने नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नेते मुख्यमंत्री होण्याच्या रिंगणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षांतरासाठी उमेदवारांना करोडो रुपयांची ऑफर दिली जाते. गोवावासीय हे होऊ देणार नाहीत असे चोडणकर म्हणाले.

Girish Chodankar
निवडणूक निकालांची भाकिते करण्यासाठी अहमहमिका

सोशल मीडियावर क्लिप व्हायरल

पोस्टल बॅलेट मतदान करताना धारबांदोडा येथील शिक्षकांना ''भाऊ'' यांनाच मतदान करा अशा आशयाचा एक ऑडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. या ऑडिओची चौकशी करावी अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पाऊसकर म्हणाले, क्लिपमध्ये एक व्यक्ती मतदान ड्युटीवर असलेल्या धारबांदोडा येथील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना 'भाऊ' यांच्यासमोर आणि त्यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगत आहे. आवाजाचा स्वर भीतीदायक आहे. तो कॉलेज कर्मचाऱ्यांना मतांसाठी बोलावत आहे. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी निवडणूक आयोगाला विनंती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com