Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: ‘भाजप कार्यकर्त्यांची नाराजी लवकरच दूर करू’

कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे. जयेश साळगावकर यांना विजयी करावे: देवेंद्र फडणवीस

दैनिक गोमन्तक

साळगाव: दिलीप परूळेकर यांच्यावर पक्ष सदैव मोठी जबाबदारी देणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे, ती लवकरच संपुष्टात येईल, असा विश्‍वास व्यक्त करून कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे. जयेश साळगावकर यांना विजयी करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी केले. (We will soon remove displeasure of Goa BJP workers statment by devendra fadanvis)

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत Goa Assembly Election साळगाव मतदारसंघात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार विजयी होऊन विधासनसभेत जाईल, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप परूळेकर यांनी काल येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला. भाजपचे गोवा Goa BJP प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis हेही उपस्थित होते. भाजपचे उमेदवार जयेश साळगावकर यांना बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परुळेकर यांनी आपल्या भाषणात केले. भाजप एकसंध असून फक्त भाजपच गोमंतकीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू शकतो, असे ते म्हणाले.

उमेदवार जयेश साळगावकर यांनीही कार्यकर्त्यांना आपल्या विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. दुरावलेल्या कार्यकर्त्यांची एकजूट करण्यात नक्की यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे आणि मतदारसंघात फिरताना आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT