Rajesh phaldesai Dainik Gomantak
गोवा

आम्ही भाजपमध्ये जाणार नाही - आमदार राजेश फळदेसाई

गोवा काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस गोवा काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर असून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरु होती. यावरुन काल गोवा काँग्रेसने बैठक घेतली. या बैठकीनंतर नेत्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या अफवेची या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती दिली गेली. यावर गोवा काँग्रेसचे आमदार राजेश फळदेसाई आणि केदार नाईक यांनी या अफवा आहेत, असे स्पष्ट केले.

काय आहे नेमकं प्रकरण ?

सोमवार दि 11 जूलै पासून राज्यात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला पुन्हा खिंडार पडणार, अशी खळबळजनक माहिती सर्वत्र सुरु होती. या गटात नेते दिगंबर कामत हे आहेत. त्यांचा भाजप प्रवेश कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्याला दिल्ली श्रेष्ठींनी मान्यता दिली. मात्र, या पक्षबदलाच्या किंवा पक्षफुटीच्या घडामोडींपासून राज्य भाजपला पूर्णत: बाजूला ठेवले आहे.

मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा मंत्री विश्वजीत राणे दोघेही काँग्रेस आमदारांना प्रवेश देण्यास अनुकूल नव्हते. अखेर पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून त्यांनी या बाबीला मान्यता दिली आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसबरोबर भाजपमध्येही खळबळ होणार याशिवाय असंतोषही वाढण्याची शक्यता असल्याची शक्यता समोर आली होती.

मात्र काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध आहेत. या नेत्यांमध्ये फूट पडण्याच्या केवळ अफवा आहेत. या चर्चांमध्ये कोणते ही तथ्य नाही. अशी माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली. तसेच आमदारांची शनिवारची बैठक ही अधिवेशनाची रणनिती ठरवण्यासाठी आम्ही एकत्र जमल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला गोवा काँग्रेसचे नेते हजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

FIFA World Cup 2026: कतारच्या खेळाडूचं 'ते' घातक टॅकल अन् कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू मैदानावरच कोसळला; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT