Rahul Gandhi in goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याला 'कोल हब' होऊ देणार नाही: राहुल गांधी

मागील 5 वर्षात भापने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत, त्यांनी 2017 मध्ये जनादेशाचा अनादर केला

दैनिक गोमन्तक

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पार्टीला बहुमत मिळेल याची मला खात्री आहे. निकालानंतर आम्ही तत्परतेने पावले उचलून सरकार स्थापन करू. कॉंग्रेस पार्टी गोव्याच्या विकासासाठी काम करेल, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. ते मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपवर (BJP) बोचरी टीका करताना राहुल गांधी म्हणाले, मागील 5 वर्षात भापने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. याउलट त्यांनी 2017 मध्ये जनादेशाचा अनादर केला. भाजपने पैशांच्या जोरावर आमचे आमदार स्वत:कडे वळवले. यावेळेस असे होणार नाही. गांधी पुढे म्हणाले, आम्ही गोव्याला 'कोल हब' होऊ देणार नाही. आम्ही खाण काम सुरू करू. आम्ही हे सर्व काही कायदेशीर पद्धतीने करू.

सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस (Congress) पार्टी गोव्यात भाजप विरोधी पक्षाबरोबर युती करणार का? असे विचारले असता गांधी म्हणाले, आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळेल. युती करण्याची गरज पडणार नाही. सत्तेत आल्यावर आम्ही अनेक योजना राबवू ज्याचा थेट फायदा गोव्याच्या जनतेला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT