'उत्तर गोव्याचा विकास झाला तर दक्षिण गोवाही पुढे जाईल'

कॉंग्रेस सरकारने स्वातंत्र्यानंतर 15 वर्षे गोवा मुक्त केला नाही; नरेंद्र मोदी
PM Narendra Modi address rally in Mapusa
PM Narendra Modi address rally in MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर 15 वर्षे गोवा स्वतंत्र केला नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्तीसाठी सैन्य पाठवणार नाही, असे म्हटले होते, असा दावा पंतप्रधान (PM) मोदींनी केला.

म्हापसा येथे एका मेगा रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "कॉंग्रेस सरकारने स्वातंत्र्यानंतर 15 वर्षे गोवा मुक्त केला नाही. गोव्यातील लोक लढत राहिले, परंतु काँग्रेस (Congress) सरकारने मदत केली नाही. लाल किल्ल्यावरून, भारताचे पहिले पंतप्रधान, जवाहरलाल. गोवा मुक्तीसाठी सैन्य पाठवणार नाही, म्हणाले होते.

PM Narendra Modi address rally in Mapusa
नरेंद्र मोदी आणि गोवा कनेक्शन; 2002 ते 2022.. 20 वर्षात काय बदललं?

राज्याच्या सर्वांगीण विकासाची गरज अधोरेखित करून ते म्हणाले की, राज्यातील एका प्रदेशाचा विकास झाला तर दुसऱ्या प्रदेशालाही फायदा होईल. "भाजप (BJP) सर्वांसाठी सर्वांगीण विकास, सर्वांसाठी समान धोरणे ठरवते. उत्तर गोव्याचा विकास झाला तर दक्षिण गोवाही पुढे जाईल."

गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com