Siddhanna Meti News Dainik Gomantak
गोवा

आम्ही गोमंतकीय म्हणूनच निवडणूक लढवू - सिद्धण्णा मेटी

पंचायत निवडणूकीसाठी कोणतेही वेगळे पॅनल किंवा बॅनर तयार करणार नाही

दैनिक गोमन्तक

पणजी : येत्‍या पंचायत निवडणुकीत गोवा कन्नड समाज स्वतःचे उमेदवार उतरविणार आहे. तशी घोषणा गोव्यातील कन्नड नेत्यांनी केल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून राज्यात आहे. यामूळे नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र आज पत्रकार परिषद घेत गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. (Siddhanna Meti News)

गेले काही दिवस सुरु असलेल्या गोवा कन्नड समाज स्वतःचे उमेदवार या वृत्ताला बगल देत आपण पॅनेल स्थापन करून पंचायत निवडणूक लढवणार नाही. आम्ही गोमंतकीय म्हणूनच निवडणूक लढवू अशी भुमिका घेतली आहे.

मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे विधान चुकीचे समजले गेले आणि चुकीचे अर्थ काढला गेला आहे. पंचायत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही कोणतेही पॅनल किंवा बॅनरखाली तयार करत नाही आहोत. कन्नडी किंवा इतर कोणत्याही संलग्न संस्था. आम्ही निवडणूक लढवू तसेच सोशल मीडियावर काही लोक जाणूनबुजून आमच्या समाजाला लक्ष्य करत आहेत. अशी अपमानास्पदस्थिती टाळण्यासाठी माध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. असे ही ते यावेळी म्हणाले.

गोव्यातील अन्य समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न - माविन गुदिन्हो

या वादात खुद्द पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी एक वेगळा गट स्थापन करून गोव्यातील अन्य समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया केली होती. याबरोबर गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी यांनी गोव्यातील ज्या भागात कन्नड समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात, तिथे पंचायत निवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार उतरवू असे म्‍हटल्याचे वृत्त ही होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT