Manoj Caculo | Panaji Smart City work  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: अरे... आम्ही तुम्हाला मते दिली, कंत्राटदारांना नाही; पणजीतील कामांवरुन उद्योजक संतापले

आमदार, महापौर जबाबदारी घेत नसल्यावरून नाराजी

Akshay Nirmale

Businessman Manoj Caculo on Panaji Smart City Work: गोव्याची राजधानी पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांसाठी शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा त्रास शहरवासीयांना भोगावा लागत आहे.

यावरून आता गोव्यातील उद्योजकांनीही सरकार आणि प्रशासनाला जबाबदार धरत दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे, शहराचे आमदार आणि महापौरदेखील या कामांची जबाबदारी घेत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक मनोज काकुलो यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामावरून नाराजी व्यक्त केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात केलेल्या खोदकामामुळे पणजी शहराची दुरवस्था झाल्याचे म्हणत त्यांनी प्रशासनाला दोषी ठरवले आहे.

काही दिवसांपुर्वीच पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजीतील कामांना मी जबाबदार नाही, तर कंत्राटदार जबाबदार आहेत, असे म्हटले होते.

त्यानंतर त्यांचे पुत्र आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनीही स्मार्टसिटीच्या कामांचे नियंत्रण महापालिकेकडे नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली होती. तसेच आगामी पावसाळ्यता पणजीची अवस्था बिकट होऊ शकते, असा इशाराही महापौरांनी दिला होता.

त्यावरून उद्योगपती मनोज काकुलो यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पणजीची स्थिती दयनीय झाली आहे. आमदार आणि महापौर जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. आता कोणत्या अभियंता, कंत्राटदाराकडे जायचे? मी त्यांना मते दिली नाहीत.

किंवा मुख्य सचिवांनाही निवडलेले नाही. G20 बैठकांसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. गोव्याचे नाव आपण का खराब करत आहोत??? असा सवालही त्यांनी केला आहे.

काकुला यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, पीएमओ, मुख्यमंत्री यांना टॅग केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tamannaah Bhatia: "थुंकी लावा,पिंपल्स घालवा" तमन्ना भाटियाचा विचित्र सौंदर्य मंत्र; सोशल मीडियावर Video Viral

Goa Assmbly Live: आनी मुख्यमंत्री म्हणटा भिवपाची गरज ना... - व्हेंन्झी व्हिएगस

Job Scam: "रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि कमवा 5 ते 8 हजार", MPच्या तरूणाने गोव्यात बसून केला स्कॅम! मुंबईच्या व्यक्तीकडून लुटले 6 लाख

America Plane Crash: अमेरिकेत पुन्हा विमान अपघात! नॉर्थ कॅरोलिनाजवळ विमान समुद्रात कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावला

Karishma Sanjay Goa Trip: नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

SCROLL FOR NEXT