Goa Shipyard: गोवा शिपयार्ड नौदलासाठी बांधणार 7 नवीन युद्धनौका; संरक्षण मंत्रालयासोबत 6,200 कोटींचा करार

संरक्षण मंत्रालयाने दिली अंतिम मंजुरी
Goa Shipyard
Goa ShipyardDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ला भारतीय नौदलासाठी ७ नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स (NGOPV) बांधण्यासाठी 6,200 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. हा करार 11 NGOPV साठी 9,781 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा भाग आहे, ज्याला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी अंतिम मंजुरी दिली.

Goa Shipyard
Goa Black Panther: बाळ्ळी येथे सापळ्यात अडकला ब्लॅक पँथर

कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE) उर्वरित चार नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स तयार करतील. NGOPV ची डिलिव्हरी सप्टेंबर 2026 मध्ये सुरू होईल आणि एकदा भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर, युद्धनौकांचा वापर चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्स, शोध आणि बचाव, सागरी गस्त आणि पाळत ठेवण्यासाठी केला जाईल.

या जहाजांच्या स्वदेशी उत्पादनामुळे गोव्यातील एमएसएमईसह भारतीय जहाजबांधणी आणि संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन मिळेल.

GSL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी या कराराचे वर्णन शिपयार्डसाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणून केले आहे. कारण संरक्षण मंत्रालयाने करारासाठी स्पर्धात्मक बोली प्रक्रिया आयोजित केली होती.

Goa Shipyard
Goa Budget 2023 : विधानसभेत ‘गोमन्तक’च्या अभिनंदनाचा ठराव

जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री असेल. 2018 मध्ये डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल (DAC) ने भारतीय नौदलासाठी अंदाजे 4,941 कोटी रुपयांच्या सहा देशी बनावटीच्या NGOPV च्या खरेदीला मान्यता दिली होती. अनिल अंबानींच्या मालकीच्या पिपावाव शिपयार्डला हे कंत्राट दिले होते.

परंतु अखेरीस अनेक विलंबांमुळे ते रद्द करण्यात आले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2020 मध्ये भारतीय नौदलासाठी प्लॅटफॉर्मची संख्या 11 पर्यंत वाढवली. गेल्या वर्षी मार्चमध्ये निविदा प्रक्रियेदरम्यान, GSL सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com