Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: 'प्रोटेस्टर्स नव्हे आम्ही चालवतो सरकार'; भूरूपांतरावरुन TCP मंत्री राणेंनी आंदोलकांना सुनावले

Goa News: न्यायालयाच्या कक्षेत राहून काम करण्याचा माझा शिरस्ता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास हे सरकार समर्थ आहे; मंत्री राणे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भूरूपांतरावरून ता. २१ गुरुवारी पणजीत झालेल्या आंदोलनावरून नगरनियोजन मंत्री राणे यांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, राज्य सरकार हे आंदोलक (प्रोटेस्टर्स) चालवत नाहीत. सरकार प्रशासन व न्यायसंस्थेनुसार चालते. सरकारने घेतलेला निर्णय राज्याच्या विकास व प्रगतीसाठी आहेत.

न्यायालयाच्या कक्षेत राहून काम करण्याचा माझा शिरस्ता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास हे सरकार समर्थ आहे. पणजी येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, अनेकदा प्रशासनामध्ये अडी अडचणी येतात. मात्र, विकास व प्रगतीसाठी त्यावर मात करून पुढे जावे लागते.

नगरनियोजन कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला आदेशाचे आम्ही स्वागतच केले आहे. सध्या आदेशाला स्थगिती असून, ते न्यायप्रविष्ट आहे. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार सुरू आहे. पूर्ण अभ्यासानंतरच निर्णय घेतला जाईल. उच्च न्यायालयाने कलम १७ (२) हे रद्द केलेले नाही, तर त्याचे नियम रद्द केले आहेत. त्यामुळे या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, असेही राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT