Yuri alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: भरकटलेले विमान स्थिर करण्याचे प्रशिक्षण मी घेतले आहे

पहिल्यांदाच सासष्टीत एकच आमदार

दैनिक गोमन्तक

मडगाव: मी प्रशिक्षित पायलट आहे. भरकटलेले विमान स्थिर कसे करावे याचे प्रशिक्षण मी घेतले आहे अशा शब्दात कुंकळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आजच्या राजकीय घटनेवर स्थिरतेसाठी आपण समर्थ असल्याची प्रतिक्रिया दिली. सासष्टी तालुका गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसमुक्त करण्यासाठी भाजपने 'मिशन लोटस' पुढे आणले होते.

(We are able to stabilize the Goa Congress said Yuri Alemao)

कुंकळीचे आमदार युरी आलेमाव बळी न पडल्याने सासष्टी तालुका काँग्रेसमुक्त होण्यापासून वाचला. असे जरी असले तरी पहिल्यांदाच या एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात काँग्रेस आमदारांची संख्या एकवर आली आहे.

2022 च्या निवडणुकीत या तालुक्यातील आठ मतदरसंघांपैकी मडगाव, नुवे व कुंकळी या तीन मतदारसंघातच काँग्रेस जिंकली होती. मात्र त्यातील दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा हे दोन आमदार आज भाजपात गेल्याने काँग्रेस पक्षाची स्थिती बिकट झाली आहे. सुरवातीला या कटात युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनाही सामील करण्यासाठी नेटाचे प्रयत्न सुरू होते. मात्र शेवटपर्यंत या दोघांनी या बंडखोरांना दाद दिली नाही.

याबद्दल आलेमाव यांना विचारले असता, मी संपूर्ण गोवेकर आणि कुंकळकराना जो शब्द दिला होता तो पाळणे माझे कर्तव्य होते. तेच मी पार पाडत आहे असे ते म्हणाले. केपेचे आमदार डिकॉस्टा यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, मी देवावर व दैवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. दैव माणसाला कुठे घेऊन जाते तिथे माणूस जातो. माझा देवावर विश्वास असून तो माझे आणि समस्त गोवेकरांचे कल्याण करेल याची मला खात्री आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT