Digambar Kamat: 'भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो'वर काँग्रेसने लक्ष देण्याची गरज - दिगंबर कामत

काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून गेले कित्येक महिने काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे. कारण आज काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. 8 काँग्रेस आमदारांसोबत गोवा विधानसभेच्या बाहेर येत माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

(8 Goa Congress MLAs joined BJP said Chief Minister Pramod Sawant)

Goa BJP
Goa Congress: ऑपरेशन लोटसनंतर जयराम रमेश यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणून...

यावेळी बोलताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले कि, काँग्रेसमधील अंतर्गत जे सुरु आहे. त्याबद्दल आपण बोललो आहेच. त्यामूळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचं ते म्हणाले. काँग्रेसला रामराम केलेल्या गुलाब नमी आझाद यांचा दाखला देत काँग्रेसला आता अंतर्गत घटकांवर काम करण्याची वेळ आलेली आहे असे ते म्हणाले.

'भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो' यावर त्यांनी विचार करणे आवश्यक आहे. तसेच आताही काँग्रेसमध्ये अंतर्गत जे काही चालले आहे ते बरोबर नाही हाच पवित्रा यावेळीही कायम ठेवला.

Goa BJP
Goa Congress Rebel: काँग्रेसमध्ये माझी घुसमट; अनेकांच्या विश्‍वासाला तडा!

या दरम्यान मायकल लोबो म्हणाले की, नुकतेच आम्ही विधानसभेतून बाहेर पडताना आमच्या भाजपमधील प्रवेशासाठीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसच्या आठही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आम्ही "काँग्रेस छोडो आणि बीजेपी जोडो" अभियान सुरू केले आहे.

यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार असून त्यासाठी संपूर्ण गोवेकरांच्या सेवेशी कायम असणार असल्याचे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com