Goa Congress Rebel: काँग्रेसमध्ये माझी घुसमट; अनेकांच्या विश्‍वासाला तडा!

काँग्रेसमध्ये राहून लोकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करता येणार नाही.
MLA Alex Sequeira
MLA Alex SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress News: काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याची चर्चा कायम असताना आज पक्षाचे ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी आपण संभ्रमात असल्याचा खुलासा करून पक्ष नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. काँग्रेस सोडून जाणार नाही असा शब्द मी निवडणुकीत नुवेच्या नागरिकांना दिला होता. त्याचे पालन मी करत आहे, परंतु पक्षात माझी घुसमट झाली आहे. त्यामुळे मी भ्रमनिरास झालो असल्याचे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजपमध्ये जाण्याची ऑफर भाजपच्या नेत्यांनी नव्हे, तर काँग्रेसच्या नेत्‍यांनी दिली होती, परंतु त्यांच्याकडे आकडा नसल्याने ही मंडळी गप्प बसली आहे. आज पक्षात गोंधळ सुरू असून अनेकांच्या विश्‍वासाला तडा गेला आहे. आज मी ज्या स्थानावर पोहोचलो आहे, त्यासाठी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे. मात्र, काँग्रेसमध्ये राहून लोकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करता येणार नाही असे मला अनेकांना सांगितले आहे, असे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

MLA Alex Sequeira
Goa Politics Latest Update| गोव्यातून काँग्रेस छोडो यात्रेला सुरुवात- CM

निवडणुकीत आम्ही विजयी होणार याचा अतिविश्‍वास अनेकांना होता. काहीजण हे मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने रंगवत होते, परंतु मतमोजणीच्या दिवशी सगळ्यांचा अपेक्षाभंग झाला. निवडणुकीत पक्षाचा कार्याध्यक्ष असूनही महत्त्वाच्या निर्णयातून मला दूर ठेवण्यात आले होते. त्यात तिकीट वाटप कोणत्या आधारावर केले गेले हे त्यावेळी पक्षाचा कारभार सांभाळणाऱ्यांना विचारले पाहिजे.

MLA Alex Sequeira
Vijai Sardesai : विरोधकाची भूमिका समर्थपणे निभावण्यास मी तयार

कारण निवडणुकीनंतर जेव्हा पराभवाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली, तेव्हा अनेक उमेदवारांनी आपण पराभूत होणार हे माहीत असल्याचे सांगितले होते. त्यांना कारण विचारल्यानंतर प्रचार थांबून इतर उमेदवारांना पाठिंबा देण्याची सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, असा दावा सिक्वेरा यांनी केला.

‘पक्षाशी संबंध नसलेल्यांना उमेदवारी’: ज्या मतदारसंघांमध्ये पक्षाकडे उमेदवार नव्हते, त्या ठिकाणी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची आवश्‍यकता होती. मात्र, तसे काही झाले नाही. उलट पक्षाशी काही संबंध नसलेल्यांना निवडणुकीच्या पाच दिवसांपूर्वी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.

MLA Alex Sequeira
Goa:'धोका अन् निर्लज्जपणाचा कळस'; दिनेश गुंडूराव यांची बंडखोर आमदारांवर आगपाखड

विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्याची जबाबदारी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याकडे होती. त्यासाठी पक्षाच्या पराभवासाठी हीच मंडळी जबाबदार होती का? असा प्रश्‍न केला असता आमदार आलेक्स सिक्वेरा (MLA Alex Sequeira) यांनी यापैकी कोणाचेही नाव न घेता उमेदवार निवडीचा निर्णय घेताना कोणालाच विश्‍वासात घेतले गेले नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com